खामगांव .खामगांव तालुक्यातील तसेच घाटाखालील तालुके यातील दिव्यांग रुग्ण व ईतर नागरीक यांना कळविण्यात येते की, सामान्य रुग्णालय, खामगांव येथे नियमित पणे अस्थिव्यंग, नेत्ररुग्ण, मतीमंद व कर्णबधीर दिव्यांग तपासणी दर बुधवारी सुरु असुन दिनांक २८.०९.२०२२ वार बुधवार रोजी सामान्य रुग्णालय खामगांव येथे सेवा पंधरवडा निमित्त आरोग्य शिबीर आयोजित केले असुन दिव्यांग विभागातील वैद्यकीय अधिकारी यांची डयुटी सदर शिबीरामध्ये लावण्यात आली असल्यामुळे सामान्य रुग्णालय खामगांव येथील दिनांक २८.०९.२०२२ वार बुधवार रोजी होणारी दिव्यांग रुग्णांची तपासणी रद्द करण्यात येत आहे. याची संबंधीत व्यक्तींनी नोंद घ्यावी असे आव्हान सामान्य रुग्णालय खामगाव चे वैद्यकीय अधीक्षक निलेश टापरे यांनी केले.