दहा वर्षापासून मंजूर झालेली पण प्रलंबित असलेली दहिगाव येथील पानी योजना तत्काळ सुरू करा या मागणीसाठी गावकऱ्यांचे गटविकास अधिकारी तथा पाणीपुरवठा विभागात निवेदन
श्रीकांत हिवाळे
नांदुरा प्रतिनिधी :- मौजे दहीगाव हे शासकीय योजनेतून जिगाव येथून पाणी योजनेत समाविष्ट असून १० वर्षांपासून हे काम प्रलंबित असल्यामुळे गावकऱ्यासमोर पाण्याचा गंभीर प्रश्न कायम असून अद्याप हि गावकऱ्यांना पाण्यापासून जाणीव पूर्वक वंचित ठेवले आहे, गावातील पाणी दुषित असून याचा गावकऱ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे.हि बाब लक्षात घेवून सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर रामभाऊ तायडे यांनी याचा पाठपुरावा करत संबंधित पाणी पुरवठा विभागाकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली, तरी देखील माहिती देण्यास टाळाटाळ होत असून गावकऱ्यामध्ये संतापाची लाट निर्माण होत आहे. तरी आपण या गंभीर बाबी कडे लक्ष देऊन आपल्या अधिकाराचा वापर करत या लोकाभिमुख कार्याची दखल घेत आमचा ज्वलंत प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी दहिगव येथील नागरिकांनी गट विकास अधिकारी यांना घेराव घालून निवेदन दिले. तसेच पाणीपुरवठा विभागात जाऊन तेथील अधिकारी यांना धारेवर धरले यानंतर वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली पाणी योजना ४ दिवसांत सुरू करून देतो असे संमधित अधिकारी यांनी कंत्राटदारा सोबत बोलून सांगितले यावेळी ज्ञानेश्वर तायडे,संकेत मिरगे,संदीप मिरगे,विजू देवकर,पवन आळशी,योगेश गायात्रे, गोपाल नायसे,नागेश दादळे,विष्णू इंगळे,गजानन नठले,विनोद बोदडे,सौरभ नायसे,प्रभाकर लोने,सुनील बोडे,सागर इंगळे,राहुल बोंद्रे,राम बघे, अमोल लोणे,राहुल रोठे, बालू गाढे,वैभव काळमेघे,रवींद्र गाठे,श्रीकृष्ण गावत्रे,दगडू शिंदे,अविनाश सोनवणे,श्रीकृष्ण टिकार,योगेश कल्याणकर,राजू नथले,निळू वावगे,देविदास राखोंडे,विठ्ठल घामोडे,प्रकाश भातुरकर,रवींद्र खंडारे,प्रकाश राखोंडे,आकाश बघे,रामदास बघे,रोहित बोडादे,सुनील बोदडे,शिवसेना तालुकाप्रमुख ईश्वर पांडव, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष नांदुरा तथा स्वराज्य बहुउद्देशिय पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अमर रमेश पाटील उपस्थित होते.
दहा वर्षापासून मंजूर झालेली पण प्रलंबित असलेली दहिगाव येथील पानी योजना तत्काळ सुरू करा या मागणीसाठी गावकऱ्यांचे गटविकास अधिकारी तथा पाणीपुरवठा विभागात निवेदन

0
6
6
8
3
9

Leave a comment