सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील फर्दापुर येथे या गावच्या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांनी अव्वाच्या सव्वा भावात चिकन,मटन विक्री करणाऱ्या अवैध दुकानदारांना नोटीसी दिल्या असून फर्दापुरात चिकन मटन विक्री करणा-या विक्रेत्याचे धाबेच दणाणले आहे.त्या कारवाईमुळे चिक,मटन विक्रेत्यामध्ये एकच खळबळ माजली आह फर्दापुर गाव हे जपान असल्या सारखेच या गावाकडे बघितले जाते या गावातील मोठ्या प्रमाणावर चिकन,मटन,वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट परवाना नसतांना सुद्धा अवैध विक्री होत आहे.हे सर्व चिकन,मटण,विक्रेते एकही दुकानदार यानी ग्रामपंचायतचे ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही किंवा ग्रामपंचायतला कोणत्याही प्रकारचा टँक्स ग्रामपंचायतला भरत नाही फ्रुड परवाना सुद्धा नाही.राष्ट्रीय महामार्ग रोडला लागून असलेल्या जागेवर अतिक्रमण करून यांनी दुकाने बसवलेल्या आहेत. गेल्या महिन्यात दहा दिवस गणेश उत्सव असताना सर्व चिकन,मटण विक्रेते यांनी 100 रुपये किलो चिकन विक्री केली होती.व बोकड्याचे मटण 600 रुपये किलो विक्री करण्यात आली. मात्र गणेश विसर्जन झाल्या नंतर ताबडतोब सर्व अवैध चिकन,मटण,विक्रेते यांनी 260 किलो रुपये नवीन दर लावून मनमानीपणा करून ग्राहकांची सर्रास लुट केली.फर्दापुर येथील एक आडदांड चिकन विक्रेता याला एका ग्राहकांने जास्त भाव फलका बद्दल विचारपूस केली की अजिंठा गावामध्ये तर 140 रुपये किलो चिकन भेटते तुम्ही का 260 रुपये चिकन विकतात गावात मलेरिया, आजार साथ चालू आहे चिकन वर हिरव्यागार माशी बसतात चिकन झाकून ठेवेत जा स्वच्छ पाण्याने धुऊन काढत जा यामुळे आजार होऊ शकतो आरोग्य धोक्यात येऊ शकते.असे विचारले असता एक चिकन विक्रेता शेख राजू शेख शब्बीर हा गुंड प्रवृत्तीची भाषा करून ग्राहकांन सोबत नेहमीच अररेरावीची भाषा करत असतो एका ग्राहकांला तो बोलला की, “लेना होगा तो ले, हमारा कोई कूच बिघाड नही सकता” ग्रामपंचायत मे सरपंच, सदस्य, हमारे ही है,पोलिस स्टेशन मे हमारे खिलाफ अगर तक्रार भी करे तो कूच फायदा नही है अशा पद्धतीची आडदांड भषा वापरुन दमदाटी दिली.तो ग्राहक यांनी “दै.साय खोज मास्तर वृत्तपत्राकडे त्याने आपली कैफियत मांडून तक्रार केली की, चिकन,मटन विक्रेता हा आडदांड ,व गुंड प्रवृत्तीची भाषा करत असून तो विक्रेता हा नेमके कोणाच्या आशीर्वादामुळे बोलतो हे ही बघणे महत्त्वाचे आहे.सर्व चिकन,मटण विक्रेते यांना ग्रामपंचायतने नोटिसा दिल्या आहेत 260 रुपये दर कमी करून योग्य* भावात विक्री करावी जवळच्या गावात ज्या पद्धतीने चिकन मटन विक्री केली जाते त्याच पद्धतीने म्हणजेच 140 रुपये भावाने विक्री करावी व ग्रामपंचायतला टँक्स पावती भरावी अन्यथा पोलिस स्टेशन मध्ये एक निवेदन देऊन सर्व विक्रेते वर कार्यवाही करण्यात येईल
सुनील मंगरुळे
ग्रामविकास अधिकारी
ग्रामपंचायत कार्यालय फर्दापुर