औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत नागरिकांनो सावधान ;सुरेश चव्हाण(सामाजिक कार्यक्रर्ता)यांचे आवाहान औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील परिसरातील शिल्लेगाव, सिद्धनाथ बाडगाव,सावंगी,येथील नागरिकांनी नवरात्री सुरु झाल्याने नवरात्रीचा उपवासासाठी भगरीचा भात व भगरीच्या भाकरी फराळासाठी खालल्या मात्र काही वेळातच त्यांना उलटी, मळमळ, पोट दुखणे, संडास असा त्रास होण्यास सुरुवात झाली म्हणून नातलगाणी लासूर स्टेशन येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून सगळ्यांची प्रकृती आत्ता उत्तम आहे यामध्ये लहान मुलाचाही समावेश आहे. दरम्यान अन्न, भेसळ प्रशासनाने तात्काळ लासूर स्टेशन येथील विविध ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णाची विचारपूस करून नोंद करून घेतली या मधील बहुतेक भाविकांनी सावंगी चौकातील एका व गीतावान येथील एका अश्या दोन दुकानातून भगर व भगरीचे पीठ खरेदी केले असल्याचे सांगितले मात्र यावेळी अन्न, औषध व भेसळ प्रशासनाच्या पथकला नागरिकांनी धारेवर धरले यावेळी रुग्णांशी बोलताना पथकातील एका महिला अधिकान्यांची जीभ घसरली व त्या बोलताना म्हणाल्या की काय खावे हे अजूनही लोकांना कळत नाही यामुळे मात्र उपस्थित रुग्णांच्या नातेवाईकांचा पारा चढला त्यानी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली व तुम्ही घटना घडायच्या आगोदर तपासन्या का करत नाही असे सुनावले व तुम्ही काहीच करू शकत नाही असे म्हणून लिहिलेला पंचनामा एका रुग्णच्या नातेवाईकाने चूरगाळून फेकला. यातील बहुतेक नागरिकांना मात्र भग्रीच्या पिठाच्या भाकरीमुळे जास्त त्रास होत होता आता बहुतेक रुग्णांची प्रकृती चांगली आहे परंतु तरीसुद्धा नागरिकांनी आपल्या आरोग्यची काळजी घ्यावी अशे आवाहन सरपंचपती सुरेश चव्हाण तथा(सामाजिक कार्यक्रर्ता)घाणेगांव ता सोयगाव यांनी केले आहे.