धाड: चिखली विधान सभा मतदार संघातील सर्व शेतकऱ्यांच्या शेताला सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी जलसंधारणाची कोट्यावधी रुपयांची कामे हाती घेऊन सदर कामे पूर्णत्वाकडे नेली आहे. शेतकऱ्यांच्या शेत पिकाला पाण्यासोबतच पुरेशी वीज मिळावी यासाठी विरोधात असताना आंदोलने केली . त्यासाठी त्यांच्या वर गुन्हे दाखल झाले. आता भाजपा सत्तेत आल्यानंतर आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी चिखली विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करत आहे. प्रत्येक गाव जसे रस्त्याने जोडले गेले तसेच प्रत्येक शेत हे रस्त्याने जोडण्यासाठी शेत पाणंद रस्ते विकासासाठी त्या सतत झटत आहेत. चिखली विधान सभा मतदार संघातील पांदण रस्ते मजबुती करणासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणला. त्यामूळे आ सौ श्वेता ताई महाले पाटील या शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास करुन त्या शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढविण्याचे प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष देविदास जाधव पाटिल यांनी धाड येथे महसूल आणि कृषी विभागाच्या महसुली कागदपत्रे आणि कृषी औजारे वाटप कार्यक्रमात केले.
लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या व 17 सप्टेंबर या वाढदिवस ते महात्मा गांधीजी यांची जयंती 2 ऑक्टोबर हा कालावधीमध्ये राज्य सरकारच्या वतीने ” राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता ” सेवा पंधरवाडा म्हणून विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात आहे. या या पंधरवड्यामध्ये सर्व शासकीय कार्यालयांमधील प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरू आहे . चिखली विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक शासकीय कार्यालयातील प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्याच्या दृष्टीने आमदार सौ श्वेता ताई महाले यांच्या संकल्पनेतून धाड येथे तहसील कार्यालय आणि तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने फेरफार अदालत आणि कृषी औजारे वितरण कार्यक्रम संपन्न झाला. तहसील कार्यालय बुलडाणाच्या वतीने जिल्हा परिषद शाळा करडी येथे सेवा पंधरवडा कार्यक्रमांमध्ये डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र वर्ग आठवी ते दहावी एकूण 270 प्रमाणपत्र वितरित करण्यात आले तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अन्नसुरक्षा योजनेचा 21 लाभार्थी यांना लाभ प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.तसेच कृषी विभागाच्या वतीने औजारे वाटप भगवान बालुबा पालकर , सातगाव यांना ट्रैक्टर संतोष रंगनाथ आघाव कुंबेफळ , क्रॉप रिपर विकास गोकुलसिंग वाघ , सावळी BBF. Planter (पेरणी यंत्र ) , कडूबा दशरथ डोईफोडे कुंबेफळ रोटावेटर राजु श्रीरंग पालकर , सातगाव यांना मळणीयंत्राचे वाटप करण्यात आले.तर पूर्व संमती पत्र वाटप प्रकाश पाटीलबा बुधवत , सोयगाव , लक्ष्मण पुंडलीक चोपडे , बोरखेड, प्रेमसिंग धनसिंग बिबे , सावळी, आत्माराम पाटीलवा उगले , रुईखेड मायांबा संदीप अर्जुन शेळके रुईखेड यांना अनुक्रमे मळणी यंत्र, कडबाकुट्टी यंत्र , पेरणीयंत्र ,नांगर आणि रोट व्हेटर या औजारांच्या खरेदीसाठी पूर्व संमती पत्र वाटप करण्यात आले.
यावेळी ॲड सुनील देशमुख, भाजपा तालुकध्यक्ष, जेष्ठ नेते डॉ तेजराव नरवाडे, योगेश राजपूत, तालुका अध्यक्ष युवा मोर्चा , विशाल विसपुते, शहर अध्यक्ष, युवा मोर्चा, विष्णू वाघ पाटिल, तालुका कृषि अधिकारी टेकाडे , नायब तहसीलदार प्रकाश डब्बे, मंडळ अधिकारी गणेश राऊत , तलाठी प्रभाकर गवळी, किशोर कानडजे, डी जे शेवाळे, रेखा वाणी कृषी विभागाचे सोनूने साहेब, सुसर साहेब व राजू ढोरे तसेच शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद व कोतवाल पालकर, प्रमोद वाघ, पंढरी वाघ , लक्ष्मण चोपडे, मधुकर वाघ , भगवान मोरे , भगवान पालकर , विशाल पालकर , संतोष आघाव, राजु डोईफोडे , राजेंद्र सोनुने दीपक लोखंडे मंडळ कृषी अधिकारी धाड, सुनील सुसर कृषी पर्यवेक्षक धाड, धनंजय सोनुने, कृषी पर्यवेक्षक , राजू ढोरे कृषी सहाय्यक, हर्षल आडवे , कु प्रतिमा जाधव , कुमारी राजमाने, कु खांडवे , अनिल सोनुने, कुमारी भागवत कुमारी लांडगे,सर्व कृषी सहायक मंडळ धाड,तसेच सर्व तलाठी व मोठ्या संख्येने शेतकरी व विद्यार्थी उपस्थित होते.