प्रयोगषिल शेतक-यांचा सत्कार हीच मुकूलजी वासनिकांना वाढदिवसाची खरी भेट – अॅड.गणेषराव पाटील

Khozmaster
6 Min Read

चिखली श्री मुंगसाजी महाराज सुतगिरणीची सुरू असलेली नफयातील वाटचाल वाखाण्याजोगी – रविकांत तुपकरश्री मुंगसाजी महाराज सुतगिरणीच्या आमसभेत सहकार व कृषी क्षेत्रातील कर्तृत्वानांचा सत्कार कॉग्रेसचे नेते महासचिव खा.मुकूलजी वासनिक यांनी जिल्हयाच्या विकासासाठी अनेकांना वेगवेगळया संस्था व कारखाने देवुन जिल्हयातील शेतकरी, विद्यार्थ्यी व बेरोजगारांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढकार घेतला. त्याचीच फलश्रृती म्हणुन श्री मुंगसाजी महाराज सुतगिरणीचे अतिषय चांगलं काम अनुराधा नगर परीसरामध्ये उभे आहे. आज सुतगिरणीच्या आमसभे निमित्त मुकूलजी वासनिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन परीसरातील कर्तृत्वान व प्रयोषिल शेतकरी तसेच सहकार क्षेत्रातील चांगली कामगिरी करणा-या मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन हा अतिषय प्रेरणादायी उपक्रम जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या संकल्पनेतून संपन्न होत आहे.प्रयोगषिल शेतक-यांचा सत्कार हिच मुकूलजी वासनिकांना वाढदिवसाची खरी भेट असल्याचे प्रतिपादन कॉग्रेसचे प्रदेष उपाध्यक्ष अॅड.गणेषराव पाटील यांनी केले. तर राजकारण बाजुला ठेवुन शेतक-यांनी समस्या सोडविण्याकरीता संघटीत होवुन आवाज उठवला पाहीजे, शेतक-यांचे उत्पादन वाढविण्यापेक्षा त्यांचे उत्पन्न वाढीसाठी राजकर्त्यांनी प्रयत्न केल्याषिवाय शेतक-यांच्या चेह-यावर आनंद झळकणार नाही, म्हणुन राज्यकर्ज्यांनी आपली धोरणं बदलायला हवीत असे सांगित श्री मुंगसाजी महाराज सहकारी सुतगिरणीची सुरू असलेली नफयातील वाटचाल वाख्याण्याजोगी असल्याचे मत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाउ बोंद्रे हे होते.  कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या कल्पकतेच्या दुरदृष्टीकोनातुन उभारण्यात आलेल्या शेक्षणीक व सहकारातील विविध संस्था सुस्थितीत व प्रगतीतथावर वाटचाल करीत आहेत. अनुराधा नगरातील उजाड माळरानावर 31 वर्षापूर्वी श्री मुंगसाजी महाराज सहकारी सुतगिरणीची उभारणी केली. आज 31 व्या आमसभेच्या निमित्ताने अभॉका कमिटीचे मुकूलजी वासनिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सहकार क्षेत्रातील कर्तृत्वान व्यक्ती तसेच प्रयोगषिल कर्तृत्वान शेतक-यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेष कॉग्रेसचे उपाध्यक्ष अॅड.गणेषराव पाटील, शेतकरी नेते रविकांत तुपकर, आदित्य अर्बनचे अध्यक्ष सुरेष देवकर, महाबिजचे संचालक वल्लभराव देषमुख, सहकार सेलचे दिपक देषमाने, बाळाभाउ भोंडे, नंदुभाउ सवडतकर, विष्णु पाटील कुळसुंदर, समाधान सुपेकर, डॉ. सत्येंद्र भुसारी, अषोकराव पडघान, रिजवान सौदागर, सुनिल तायडे, अतहरोद्यीन काझी, डॉ. इसरार, आसिफ भाई, दासा पाटील, ज्ञानेष्वर सुरूषे, पांडुरंग पाटील भुतेकर, भगवानराव भोंडे, कृषी योध्दा ज्ञानेष्वर खरात, विनायक सरनाईक यासह सुतगिरणी, बाजार समिीचे सर्व संचालक आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.    यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन शेतक-यांना संबोंधीत करतांना शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले कंेद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे एकीकडे विदर्भातील शेतक-यांषी निगडीत सहकार क्षेत्रातील उद्योग धंदे बंद पडत आहेत. श्री मुंगसाजी महाराज सहकारी सुतगिरणी माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या मार्गदर्षनात सुस्थितीत प्रगतीपथावर वाटचाल करीत असल्याचे सांगुन एकीकडे सुतगिरण्या बंद पडत असतांना चिखलीतील ही सुतगिरणी राहुलभाउंच्या मार्गदर्षनात नफयात सुरू असल्याचे समाधान आपल्या मनोगतातुन व्यक्त केले. रविकांत तुपकर पुढे म्हणाले शेतक-यांच्या उत्पादीत मालाला चांगले उत्पन्न म्हणजेच चांगला भाव मिळाला तरच शेतक-यांचे आर्थीक स्तर उंचावेल. व्हेटीलेटरवर ठेवलेल्या रूग्णांसारखी विदर्भातील शेतक-यांची अवस्था झाली असल्यसाचे सांगुन शेतक-यांनी जागरूक राहुन भाववाढीच्या हक्कासाठी भांडले पाहीजेत. त्यांनी अत्याधुनीक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनविन प्रयोग केले पाहीजे, त्याचबरोबर प्रक्रीया उद्योग निर्मीतीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवुन लढा उभारण्याची गरजेचे आहे.शेतक-यांची समर्थ साथ व विष्वासामुळे सुतगिरणी सुसिस्थीत – राहुलभाउ बोंद्रे

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलतांना राहुलभाउ बोंद्रे म्हणाले की, अनुराधा परिवारातील सुस्थितीत व प्रगतीची उतुंग षिखरे गाठणा-या संस्था उभारणीत खासदार वासनिक साहेबांचे वेळोवेळी योग्य मार्गदर्षन व सहकार्य लाभले आहे. त्याचबरोबर या परीसरातील शेतकरी व भागधारकांनी विष्वासाची साथ दिली म्हणुनच सुतगिरणी प्रगतीपथावर आहे. विदर्भातील सुतगिरण्या तोटयात असतांना ही सुतगिरणी मात्र कर्मयोगी तात्यासाहेबांच्या मार्गदर्षनाखाली नफयात वाटचाल करीत आहे. तसेच तात्यासाहेबांनी उभारलेल्या विविध संस्थाच्या दर्जाची नोंद घेण्यासारखी आहे. येथील शेैक्षणीक संस्थामधील विदयार्थी अमरावती विद्यापीठात कायम पहिल्या क्रमांकावर उर्त्तीण होत आहेत हा शैक्षणीक दर्जा नोंद घेण्यासारखा आहे. यावेळी शेती व शेतक-यांच्या समस्यांवर बोलतांना राहुलभाउ म्हणाले की, केंद्र सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवित असुन देषात लोकषाही कागदावरच आहे नव्हे तर ती अस्थित्वात टिकली पाहीजे, त्यासाठी देष एकसंघ राहला पाहीजे.यावेळी सहकार व कृषी क्षेत्रातील सत्कार करण्यात आलेल्या मान्यवरात आदित्य अर्बनचे अध्यक्ष प्रा.सुरेष देवकर, श्री मुंगसाजी महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष दिपक देषमाने, जेष्ठ पत्रकार राजेंद्र काळे, बालाजी अर्बनचे नारायण भवर, आदर्ष अर्बनचे अध्यक्ष विलास भडाईत, 6व्यांदा महाबिजच्या संचालकपदी आरूड झालेले वल्लभराव देषमुख, तर युटयूब चॅनलवरून शेतक-यांना मार्गदर्षन करणारे कृषी योध्दा ज्ञानेष्वर खरात, शेषराव सोळंकी, विष्णु सोळंकी कोलारा, प्रयागबाई डुकरे वाघापुर, समाधान वाघमारे सावरगांव, बाळकृष्ण अवचार मेरा खुर्द, योगेष रिंढे व विजय चिंचाले मालगणी, विजय आंभोरे मंगरूळ नवघरे, धनंजय रूद्राक्ष बोरगांव वसु, राजेष झगरे सोमठाणा, आनंद लहाने काटोडा, विðल सरनाईक शेलगांव, गोपाल डुकरे भोगावती, गणेष देषमुख गोदरी, अनिल जुमडे पिंपरखेड, जर्नादन सुसर षिरपुर, गजानन परीहार अंचरवाडी, नंदु धोंडगे काटोडा तसेच अंबषी येथील सौ.कांचन व विजय सरनाईक दांपत्याचा यावेळी येथोचित सत्कार करण्यात आला.या प्रसंगी आदिती अर्बनचे अध्यक्ष सुरेष देवकर, कृषी योध्दा ज्ञानेष्वर खरात तथा अंबाषी येथील शोतकरी विजय सरनाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपिठावर मुंगसाजी महाराज सुतगिरणीचे सर्व संचालक, बाजार समिीचे सर्व प्रषासक, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. या आमसभेचे सविस्तर अहवाल वाचन सुतगिरणीचे व्यवस्थापक विषाल मवाळ, कार्यक्रमाचे प्रास्तावीक संचालक जगन्नाथ पाटील, संचलन प्रा.उन्मेष जोषी यांनी तर आभार प्रदर्षन बाजार समितीचे मुख्य प्रषासक नंदुभाउ सवडतकर यांनी केले.

0 6 6 8 3 9
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17:57