३३ के. व्ही. लाईन गावातील एखादा जीव गेल्यावर स्तलांतरीत होणार का ? – मनोज जाधव

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी रवि मगर – तालुका चिखली, जिल्हा. बुलढाणा येथील पेठ हे गाव क्षेत्रफळाने खूप मोठे आहे. सदर गावातून 33 के. व्ही. पोल लाईन लोकवस्ती मधून गेली आहे. विज लाईन / तार मुळे जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर ३३ के. व्ही. ही पोल लाईन गेल्या ५० ते ६० वर्षांपासून जुनी असून या लाईनचे तार तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तार तुटल्यास अनेकांचे जीव जाऊ शकतात. कारण या के. व्ही. लाईनच्या आजू बाजूला नागरिक वास्तव्य करून राहत आहे. काहींच्या तर घरावरून विजेचे तार गेलेले आहे. आणि पैनगंगा या नदीला दरवर्षीप्रमाणे खूप मोठा पूर येत असतो यामुळे नदीच्या नजीक राहणाऱ्या नागरिकांना काही पर्याय नसल्यामुळे पेठ जुन्या गावातील नागरिक हे नदीच्या पुराच्या भीतीने अलीकडे ( स्तलातरीत ) झाले आहे . राहावयास आले आहे. यामुळे अजून जास्त संख्या के. व्ही. लाईन च्या भोवताली झाली आहे. यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार ग्रामपंचायत पेठ यांनी २०१७ च्या अगोदर ग्रामसभेमध्ये सर्वानुमते ठराव पारित करून लाईन स्थलांतरित करण्याची मागणी *(उपकार्यकारी अभियंता महावितरण उपविभाग चिखली)* / *(कार्यकारी अभियंता महावितरण विभाग बुलढाणा )* यांच्याकडे वेळोवेळी करून सुद्धा त्यांनी नागरिकांना केराची टोपली दाखवली आहे. वेळोवेळी मागणी करत असताना परत दिनांक २४/०८/ २०१७ ला ग्रामपंचायत येथील मासिक सभेमध्ये सर्वानुमते ठराव पारित करून मागणी करण्यात आली. त्यानंतर परत ग्रामपंचायत पेठ ठराव क्रमांक ०६ दिनांक ३०/ १० २०२१ रोजी ग्रामसभेमध्ये पारित करून प्रशासनाला दिला आहे. तरीसुद्धा प्रशासन याकडे कानाडोळा करून बघत आहे. यावरून असे दिसून येते की प्रशासन एखाद्या नागरिकाचे प्राण जाण्याची वाट तर बघत नाही ना? तात्काळ याकडे लक्ष देऊन ३३ के. व्ही. लाईन स्थलांतरित करण्यात यावी. ही आपणास विनंती. लाईन स्थलांतरित न केल्यास गावकऱ्यांच्या वतीने येत्या दिनांक ११/१०/२०२२ रोजी उग्र आंदोलन बुलडाणा येथे छेडण्यात येईल. असा इशारा मनोज जाधव यांनी दिला. आणि याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील.

 

0 6 6 8 3 8
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17:57