ज्ञानेश्वर सुपेकर
लोणार- गेल्या दोन वर्षांपासून कोरोना साथरोगामुळे सरोवरातिल प्राचीन मंदिर भाविकांसाठी बंदच होते , यंदा मात्र सदर साथरोग विघ्न टळले असल्याने सर्वसामान्य असून नागरीक तथा भाविकांना कमळजा मातेच्या दर्शनासाठी सरोवरात प्रवेश दिला जाणार वनविभागाच्या बतीने काही नियमावली जारी केली गेली आहे सरोवरातिल देवीचे मंदिर जवळपास हजार वर्ष जुने असून विदर्भ मराठवाड्यातील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या या देवीचे यंदा दर्शन मिळणार असल्याने भाविकांमध्ये आनंदी वातावरण आहे. सदर मंदिर सरोवरातील अभयारण्य क्षेत्रात स्थित असल्याने या ठिकाणी जाण्यासाठी पाय वाटेचाच वापर करावा लागतो या क्षेत्रात जंगली प्राण्यांचा मुक्त संचार असतो, त्यात प्रामुख्याने बिबट् कोल्हे तडस यांसारखे हिस्व प्राणी तसेच विषारी साप सुध्दा असल्याने भाविकांनि सकाळी ६ वाजेनंतरच सूर्यप्रकाश असताना दर्शनासाठी गटा गटाने जावे, तसेच वनविभागाने नेमून दिलेल्या पायवाट रस्त्याचाच वापर भाविकांनिकरावा, सोबत कुठल्याही प्रकाच्या प्लास्टिक कॅरिबॅग नेउ नये तसेच योग्य ति नोंदणी करावा लहान मुले स्त्रीया वृद्ध व्यक्तीनि आपल्या सुरक्षेची योग्य ति काळजी घेणाऱ्या व्यक्ती सोबतच दर्शनासाठी जावे, वनविभाग नागारिकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देनार असल्याने रस्त्याने जाते येते वेळी कुणीहि आरडाओरड करीत जाउ नये तसेच वन्यप्राण्यांना पक्षाना त्रास होइल असे वाद्य वाजवू नये असे आवाहन सुध्दा वनविभागाने भाविकांना केले आहे वरील सर्व नियमांचे पालन करूनच भाविकांनि कमळजा मातेच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील प्राचीन कमळजा माता मंदिर भाविकांसाठी उघडले जाणार असून माता कमळजा देवीच्या दर्शनासाठी नवरात्र उत्सवात सरोवरात प्रवेश करनाऱ्या भाविकानि नियमाचे पालन करावे असे आवाहन वनविभाग वन्यजीव अभयारण्य लोणार च्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.