दिपक मापारी, रिसोड सवड येथील युवकांची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या..!!विहिरीत उडी मारून ३५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता रिसोड तालुक्यातील सवड शेत शिवारात उघडकीस आली. प्रमोद शेषराव लाटे, वय ३५ वर्ष रा. सवड असे मुतकाचे नाव आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी आहे की, प्रमोदच्या कुटुंबातील लोक रिसोड वाशिम मार्गावर असलेल्या शेतात सोयाबीन कापणीचे काम करण्यासाठी गेले होते. या दरम्यान प्रमोद शेतात पोहोचला नव्हता. दिवसभर शोध घेतल्यानंतर प्रमोद विहिरीत असल्याचे स्पष्ट झाले. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत..
Users Today : 5