कोयाळी बु.येथील बौध्द वस्तीमध्ये घाणीचे साम्राज्य..!!

Khozmaster
1 Min Read

दिपक मापारी, रिसोड अनेक वेळा विनंती करूनही ग्रामपंचायतचे या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत आहे..रिसोड येथून जवळच असलेल्या रिठद सर्कलमधील कोयाळी बु. येथीलसमस्त गावकरी मंडळी कोयाळी बु.यांच्या वतीने गजानन काळे यांच्या घरापासून ते भास्कर मोरे यांच्या घरापर्यंत प्लाटवाडी मुख्य रस्त्यावर संपूर्ण घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. सदर सांडपाण्याची व्यवस्था, व विल्हेवाट लावून हा प्रश्न मार्गी लावावा, सदर घाणीला सर्वस्वी ग्रामपंचायत जबाबदार आहेत. कारण अनेक निवेदन आणि विनंत्या केल्या तरी सुद्धा ग्रामपंचायत यांनी दखल घेतली नाही. समस्थ गावकऱ्यांच्या वतीने गटविकास अधिकारी रिसोड यांना निवेदनात नमूद करण्यात आले की,सदर रस्त्यावरील घाण पाणी हे बौद्ध वस्तीतील लोकांच्या घरांमध्ये जात असून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आलेले असताना ग्रामपंचायत प्रशासनाचे मात्र या प्रकाराकडे हेतू परस्पर दुर्लक्ष दिसून येत आहे.त्वरित या रस्त्यावरच्या घाणीचे नियोजन करून दोन्ही बाजूला नाली बनवण्यात यावी. येणाऱ्या १० दिवसात जर हे काम झाले नाही तर संपूर्ण रस्ता बंद करण्यात येईल. असा इशारा युवा नवयुवक मंडळ अध्यक्ष श्री. गजानन आनंदा वानखडे , महिला मंडळ श्रीमती. सत्यभामाबाई रामेश्वर मोरे , शांताबाई भास्कर मोरे, लताबाई बबन अंभोरे , नंदाबाई राघोजी वानखडे, यांनी दिला..

0 9 3 7 2 4
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *