दिपक मापारी, रिसोड
जिल्ह्यातील १५ लाख ६८ हजार ५३ शेतकर्यांना तब्बल १९५कोटी ४७ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश शासनाने निर्गमित केला आहे. जिल्हाभरातील शेतकर्यांना हा मोठा दिलासा आहे. शेतकर्यांना अतिवृष्टीची मदत मिळावी यासाठी खासदार भावना गवळी यांनी शासनांना वेळोवेळी पत्र देवून पाठपुरावा केला होता. या पत्राची दखल घेवून शासनाने जिल्ह्याकरिता वाढीव मदत जाहीर केली आहे.
जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. यामध्ये पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली होती. शेतातील पिके जमीन दोस्त झाल्यामुळे शेतकरी पुरते हवालदिल झाले होते. अतिवृष्टीचे खासदार भावना गवळी यांनी प्रत्येक्ष शेतकर्यांच्या शेतात जावून पाहणी केली. व शासनाकडे नुकसान भरवाई साठी पत्र देवून व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारंवार फोनवर बोलून पाठपुरावा केला. त्यानंतर शासनाने नुकसानीचे पंचनामे करून त्वरित अहवाल पाठविण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले होते.जिल्ह्यातील १लाख ५६ हजार ८५३ शेतकर्यांना तब्बल १९५ कोटी ४७ लाख रूपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.
शासनाने आज जाहीर केलेली नुकसान भरपाई ही वाढीव दराने आहे. पूर्वीनुकसानीची मर्यादा केवळ २ हेक्टर पर्यंत होती. ती आता ३ हेक्टरपर्यंत वाढविण्यात आली असून कोरडवाहू पिकांच्या नुकसानीची भरपाई प्रति हेक्टरी ६८०० वरून १३६०० करण्यात आलेली आहे. बागायत पिकांची नुकसान भरपाई १३५०० वरून २७००० तर बहुवार्षिक पिकांची नुकसान भरपाई १८००० वरून ३६००० करण्यात आलेली आहे. या वाढिव दरानुसार जिल्ह्यातील शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे..
Users Today : 22