सिंदखेड राजा, दि. ३ (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाला सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊंचे दर्शन घडवून, तो तीन दिवसांसाठी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात नेण्यासाठी ३ फेब्रुवारी २०२६ रोजी रवाना करण्यात आला.
प्रारंभी राजमाता जिजाऊंच्या राजवाड्यापासून सजवलेल्या रथात अस्थिकलश ठेवण्यात आला. रथावर अजितदादा पवार यांचे बॅनर लावण्यात आले होते. त्यानंतर राजवाड्यासमोर सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
सर्वपक्षीय नेते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या श्रद्धांजली कार्यक्रमास आ. मनोज कायंदे, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर, भाजप प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, नगराध्यक्ष सौरभ तायडे, राष्ट्रवादी नेते डॉ. रामप्रसाद शेळके, भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील कायंदे, माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा सह संपर्कप्रमुख छगनराव मेहेत्रे, सावता परिषद प्रदेश उपाध्यक्ष श्याम मेहेत्रे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विष्णू मेहेत्रे, माजी नगराध्यक्ष सतीश तायडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख अतिश तायडे, शिवसेना विधानसभा प्रमुख शिवप्रसाद ठाकरे, नगरपरिषद उपनगराध्यक्ष दिपाली मस्के, विरोधी पक्षनेते नीलेश ठाकरे, नगरपरिषद गटनेते अॅड. संदीप मेहेत्रे, शरद पवार राष्ट्रवादी नगरपरिषद गटनेते दिलीपराव आढाव, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस भगवानराव सातपुते, नगरसेवक संतोष मेहेत्रे, कैलास मस्के, शेख अजीम, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक मेहेत्रे, राजीव गांधी महाविद्यालयाचे अध्यक्ष दीपक ठाकरे, नगरसेवक उमेश खरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Users Today : 8