विशेष प्रतिनिधी : आज नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथी (NCH) च्या अधिकाऱ्यांसोबत विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत देशातील होमिओपॅथिक शिक्षण अधिक सक्षम व गुणवत्तापूर्ण करण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान होमिओपॅथिक संस्थांसाठी Minimum Standards of Requirements (MSR) अधिक प्रभावी व काटेकोर करण्यावर भर देण्यात आला. तसेच देशभरातील होमिओपॅथी शिक्षणाची गुणवत्ता उंचावणे, अभ्यासक्रम अधिक व्यावहारिक बनवणे आणि संस्थांमधील शैक्षणिक व क्लिनिकल पायाभूत सुविधा मजबूत करण्याबाबत महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली.
विद्यार्थ्यांना उत्तम क्लिनिकल प्रशिक्षण, आधुनिक संशोधन सुविधा उपलब्ध करून देऊन आयुष परिसंस्था अधिक सक्षम करणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या माध्यमातून भविष्यात होमिओपॅथिक शिक्षण अधिक विश्वासार्ह, दर्जेदार आणि परिणामकारक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
होमिओपॅथिक शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी NCH अधिकाऱ्यांसोबत विशेष आढावा बैठक
0
9
2
6
4
1
Users Today : 8
Leave a comment