अकोला – प्राण्यांवर व पर्यावरणावर होणारे दुष्परीणाम पाहता कठोर कारवाई करण्याचे दृष्टीने 75 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या, नायलॉन मांजाचा वापर त्याचप्रमाणे प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्ती यांची आयात, साठवणूक, उत्पादन, वितरण व विक्री आणि खरेदी / वापर करणाऱ्या प्रतिष्ठानांवर / व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याकरीता मानधन तत्वावर मन्युष्यबळ उपलब्ध असणाऱ्या संस्थेची निवड करण्यात येणार आहे.
त्यासाठी दि.10 ऑक्टोंबर रोजी सकाळी 12 वाजता जिल्हाधिकारी यांचे दालन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आवश्यक सर्व कागदपत्रासह इच्छुक संस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.