हिंगोली जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा हिंगोली विधानसभेचे २०१९ चे उमेदवार वसिम देशमुख यांनी त्यांच्या समर्थकासह शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंञी *मा.ना.उध्दवजी बाळासाहेब ठाकरे* यांच्या हस्ते आज दि.२१ जानेवारी २०२३ रोजी मातोश्री मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला.
त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हिंगोली शहर उपाध्यक्ष शेख अमजद ,टिप्पु सुलतान ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष जुबेर पठाण,वंचित आघाडीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद जहिर ,हिंगोली जिल्हा सचिव शेख गणी यांनी प्रवेश केला.
यावेळी खासदार मा.विनायकराव राऊत ,हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख श्री.बबनराव थोरात,हिंगोलीचे माजी खा.सुभाषराव वानखेडे ,माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर ,हिंगोली जिल्हा सहसंपर्कप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील,जिल्हाप्रमुख संदेश देशमुख ,जिल्हा संघटक बाळासाहेब मगर,जिल्हा सहसंघटक ॲड.रवि शिंदे ,सुजय पाटील सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
Users Today : 8