प्रतिनिधी मूर्तिजापूर
– शहरातील चिखली गेट जवळील रेल्वे लाईनवर रेल्वेच्या धडकेने एका २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार प्रमोद समाधान वाकोडे वय ४३ वर्ष राहणार चिखली गेट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फिर्यादीचा मामे भाऊ भीमानंद बाळू इंगळे वय २४ वर्ष राहणार निंभारी पोस्ट असदपूर तालुका अचलपूर जिल्हा अमरावती हा फिर्यादीच्या घरी आला होता त्याला दारू पिण्याचे व्यसन असल्याने सायंकाळचे साडेसहा वाजले तरी तो घरी न आल्यामुळे त्याचा शोध घेतला असता, रात्री रेल्वे लाईन वर पोल क्रमांक ६२९/ २६ जवळ भीमानंद इंगळे हा मृतावस्थेत आढळून आला.सदर घटनेची माहिती रेल्वे पोलिस व शहर पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळावर तपास केला असता त्याच्या बाजूला बॉबी देशी दारूची बॉटल दिसून आल्याने तो रेल्वे लाईनवर दारू पित असताना रेल्वेची धडक लागून त्याचा मृत्यू झाल्याची शंका वर्तवून तसेच फिर्यादीनुसार शहर पोलीस स्टेशनला कलम १७४ नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करून अधिक तपास शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सचिन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक राहुल देवकर , पो.कॉ. विजय साबळे करीत आहेत.
Users Today : 9