दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालयाच्या एन. सी. सी. विभागाचा माजी एन. सी. सी. कॅडेट शिपाई गोपाल विजयकर जो सध्या महार रेजिमेंट मध्ये भारतीय सैन्यात सेवा देत असून तो सिक्किम येथे कार्यरत आहे. यांनी एन.सी.सी. युनिटला भेट देऊन कॅडेट्सला आर्मी दिना निमित्त मार्गदर्शन केले. श्रीमती एल.आर.टी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. जी. चापके व महाविद्यालयाचे एन. सी. सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. एन. सी. सी. कॅडेट्सला मार्गदर्शन करतांना कॅप्टन डॉ.अनिल तिरकर म्हणाले की, आर्मी दिवस हा दरवर्षी १५ जानेवारी रोजी भारतीय सैन्यातील सैनिक आणि सैनिकांच्या शौर्याला सलाम आणि सन्मान देण्यासाठी साजरा केला जातो. आज भारत देशामध्ये ७५ वा आर्मी दिवस साजरा होत असून, एन.सी.सी. हे आपल्या भारतीय सैन्यात सामील होण्याची पहिली पायरी आहे. जिथे एकता, शिस्त आणि आत्मविश्वास वाढवील्या जातो. कॅडेट्सना प्रेरित करतांना शिपाई गोपाल विजयकर म्हणाले की, भारतीय सैन्य हे जगातील उत्कृष्ट सैन्यांपैकी एक आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय एकात्मता सुनिश्चित करणे हे भारतीय सैन्याचे मुख्य लक्ष आहे. एन.सी.सी. आणि आर्मीचे काम शिस्त आणि एकतेवर आधारित आहे. आपला देश आपल्या लोकांना एकत्र आणि सुरक्षित ठेवण्यासाठी आपले भारतीय सैन्य दररोज करत असलेल्या महान त्यागाची वेदना आपल्याला जाणवली पाहिजे. याप्रसंगी त्याने आर्मी दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्यात. या कार्यक्रमाला दि. बी. जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. विजयकुमार तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष श्री. रवींद्र जैन, मानद सचिव श्री. पवन माहेश्वरी, सहाय्यक सचिव इंजि. अभिजित परांजपे व समस्त माननीय कार्यकारी सदस्यांनी एन.सी.सी. कॅडेट्सला शुभेच्छा देऊन आत्मविश्वास वाढविला. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सीनियर अंडर ऑफिसर रोहित डिगे, जूनियर अंडर ऑफिसर मिनल रेड्डी, जूनियर अंडर ऑफिसर श्याम ढोरे, सार्जंट जयश्री हरसुलकर, सार्जंट ऋषिकेश पटेल, कॉर्पोरल शिवानी अवातिरक, कॉर्पोरल ओम डांगे, कॉर्पोरल प्राजक्ता नारखेडे, कॉर्पोरल वैष्णवी ढेंमरे, कॉर्पोरल कार्तिक लाडगे, कॉर्पोरल सागर वानखडे, कॅडेट शिवम देशमुख, कॅडेट रेशमा गालफाडे, कॅडेट वैष्णवी पांडे कॅडेट, कॅडेट किरण माने, कॅडेट धनश्री चव्हान, कॅडेट नितिक्षा पांडे, कॅडेट सारीका यादव, कॅडेट भुमी काशिद, कॅडेट हर्षा गायकवाड़, कॅडेट सिमरन इंगले, कॅडेट सलोनी यादव, कॅडेट स्नेहल गायकवाड़, कॅडेट साहिल बुंदेले, कॅडेट सुरज सरकटे, कॅडेट ॠषिकेश शेलार, कॅडेट जय नांदोडे, कॅडेट रोशन इंगोले, कॅडेट प्रणव वानखेड़े, कॅडेट श्रिकांत वाडोकार आणि इतर कॅडेट्सनी बरीच मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन जूनियर अंडर ऑफिसर मिनल रेड्डी हिने तर आभार प्रदर्शन सार्जंट जयश्री हरसुलकर हिने केले.
Users Today : 9