मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी (मो रिज़वान सिद्दीकी) फोटो जुन्या हिरपुर मार्गावर मुर्तीजापुर नगरपरिषद अंतर्गत नाल्याचे बांधकाम दरम्यान भिंत कोसळल्याने दोन दिवस जागी ठार झाले तर एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 22 जनवरी रोजी संध्याकाळी पाचच्या च्या दरम्यान घडली मिळालेल्या माहितीनुसार हिरपूर मार्गावर असलेल्या जुन्या नाल्याच्या बांधकाम दरम्यान सात युवक त्या ठिकाणी काम करत होते. कामाच्या दरम्यान जुन्या डब्बाराची भिंत चक्क युवकांच्या अंगावर कोसळल्याने सागर नरेश सोळंके वय 24 राहणार जुनी वस्ती मुर्तीजापुर लकी लखन पाचरे वय 18 राहणार मोचीपुरा हे दोन्हीही जागीच ठार झाले तर साबिर शाह मोहम्मद शहा वय 22 वर्ष राहणार हे गंभीर जखमी झाले गंभीर जखमी झालेले युवकांना तातडीने लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार साठी आणण्यात आणले परंतु प्रकृती चिंताजनक असल्यामुळे गंभीर जखमी असलेले साबिर शाह यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले मुर्तीजापुरात ही घटना घडल्यामुळे सर्वत्र ठिकाणी हळूहळू व्यक्त होत आहे तातडीने बांधकाम संबंधित असलेले ठेकेदार अभियंता यांच्यावर मनुष्य दोषच गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईक परिवाराकडून करण्यात येत आहे त्याचबरोबर त्यांच्यासोबत काम करणारे युवक ऋषभ भारत कलचीडे हे सुद्धा काम करत होते परंतु कामादरम्यान समोर गेल्यामुळे ऋषभ यांचे प्राण वाचले देव तारी त्याला कोण मारी ही घटना यावेळेस मिळाली मुर्तीजापुर शहरात तरुण युवकांचे प्राण गेल्यामुळे शोककाळाच्या वातावरण पसरलेला आहे घटनास्थळी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय मध्ये मुर्तीजापुर चे आमदार हरिश पिंपळे यांनी तातडीने भेट देऊन मृत्यू झालेल्या दोन युवकांना मदत केल्या जाईल असा आश्वासन सुद्धा दिला आहे
Users Today : 13