शालेय पोषण आहारामध्ये पाल पडलेली खिचडी 14 चिमुकल्यांनी व चार महिलांनी खाल्ली

Khozmaster
2 Min Read
प्रतिनिधी
 पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम सारकिन्ही येते अंगणवाडीतील मुलांच्या पोषण आहारात पाल आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील सारकिन्ही गावात हा प्रकार उघडकीस आला आहे अंगणवाडीमध्ये 30 विद्यार्थी असून यापैकी 15 मुले आले होते तब्बल 14 चिमुकल्यासह चार महिलांनी ही खिचडी खाल्ली होती सुदैवाने यातून कोणालाही काही झालं नाही सर्वांची प्रकृती चांगली असल्याचे महान येथे आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष इंगळे यांनी सांगितले दरम्यान अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासाठी तांदुळाची खिचडी शिजवायला टाकली त्यावर झाकण न ठेवल्यामुळे त्या खिचडीच्या पातेल्यामध्ये मध्ये पाल पडली आणि ती पूर्ण खिचडी शिजली त्यानंतर तीच खिचडी मुलांना खाण्यासाठी दिल्या गेली होती त्यावेळी लक्ष संतोष आंबेकर या पाच वर्षीय मुलाच्या खिचडीत पाल दिसून आली त्यावेळी एकच खळबळ माजली त्यातील काही विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ली कुणालाही पोटदुखी तसेच मळमळ झाली नाही परंतु 15 जणांना रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले आहे मात्र आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते बार्शीटाकडी तहसीलदार गजानन हमाल यांची आरोग्य केंद्राला भेट वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंगळे यांच्याशी केली चर्चा बार्शीटाकळी ठाणेदार सुनील सोळंके व पिंजर पोलिसांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन केली चौकशी
अंगणवाडीतील खिचडी बनवताना हलगर्जी करणाऱ्या विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे गैरहजर असलेल्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या विरुद्ध शासन कुठलि कारवाई  करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाल्याने शालेय पोषण आहार बनवीणाऱ्यांच्या हळगर्जीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे
0 9 3 7 7 4
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *