प्रतिनिधी मूर्तिजापूर – तालुक्यातील ग्राम सिरसो येथील २७ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २१ जानेवारी रोजी उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार रवी किसन अंबाडे वय २७ वर्ष राहणार सिरसो यांने शुक्रवार २० जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या पाठीमागे असलेल्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली असल्याची घटना २१ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली असता ग्रामीण पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर दाखल होऊन प्रकाश ज्ञानदेव अंबाडे वय ४८ वर्ष राहणार सिरसो यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १७४ सीआरपीसी नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेचे नेमके कारण कळू शकले नाही.अधिक तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस करीत आहे.
Users Today : 12