रितेश कुमार टीलावत
तेल्हारा प्रतिनिधी
तेल्हारा येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त
दोन हजार नागरिकांनची डॉक्टरांकडून तपासणी
तेल्हारा दि :- धकाधकीच्या आयुष्यामध्ये माणूस आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहे परंतु वाढत्या वयानुसार सर्वांनी आपल्या आरोग्याला जपणं आवश्यक आहे असे प्रतिपादन लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांनी लोकजागर मंच व गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तेल्हारा येथे आयोजित रोग निधान शिबिरामध्ये केले आयोजित शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दोन हजार नागरिकांनची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली .
लोकजागर मंच व गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तेल्हारा येथील भागवत मंगल कार्यालय मध्ये भव्य असे रोग निधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये आपले अध्यक्षीय भाषण करताना अनिल गावंडे यांनी लोकजागर मंचने या पूर्वी घेतलेले रोग निधान शिबिर व आतापर्यंत केलेल्या समाज उपयोगी उपक्रमा बाबत माहिती दिली. आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लोकजागर मंचचे जिल्हा अध्यक्ष मनीष भांबुरकर गोदावरी फाउंडेशन व डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव भुसावळ व रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर डॉ. अब्दुल्ला डॉ. जान्हवी बनकर डॉ. यश पाटिल डॉ. शुभम डॉ. आशिष बावनकर डॉ. करुनेश गुप्ता जनसंपर्क अधिकारी विशाल शेजवळ अमीन तळवी व परिचारिका तेजस्विनी राऊत अंकिता टेंबरे भारेला साक्षी सातपुते साक्षी चोपडे व त्यांची चमु या आरोग्य शिबीराला उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामभाऊ फाटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन लोकजागर मंचचे जिल्हाध्यक्ष मनीष भांबुरकर यांनी केले तालुकाध्यक्ष अमोल जंजाळ व लोकजागर मंचच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सदर रोग निदान शिबिर यशस्वी करण्याकरिता प्रयत्न केलेत आयोजित रोग निधान शिबिरामध्ये तेल्हारा परिसरातील दोन हजार नागरिकांनची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली या शिबिराचा लाभ घेतला.
चारशे नागरिकांची आ.भा.करीता नोंदणी..
सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही रुग्णालयांमध्ये फायदेशीर ठरणारी(ABHA) आयुष्यमान भारत कार्डाची नोंदणी लोकजागर मंचच्या वतीने आयोजित रोगनिदान शिबिरात करण्यात आली यावेळी चारशे नागरिकांची कार्ड करिता नोंदणी झाली आहे.
Users Today : 13