रितेश कुमार टीलावत
तेल्हारा प्रतिनिधी
तेल्हारा दि :- राजमाता माँ जिजाऊ जयंती ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती पर्यंत एक हजार एक बॉटल च्या रक्तदानाचा शिवसंकल्प तेल्हारा तालुक्यासह शहरातील शिवप्रेमीनी केला आहे यामध्ये आतापर्यंत शहरा सह तालुक्यातील तीनशे रक्तदात्यांनी आपल्यामुळे कुणाचे तरी प्राणवाचतील या उद्देशाने प्रेरित होऊन या राष्ट्रीय व सामाजिक कार्यामध्ये आपले योगदान देऊन रक्तदान केले आहे.
शिव संकल्प अभियानांतर्गत माँ जिजाऊ जयंती ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती पर्यंत तेल्हारा शहरासह तालुक्यामध्ये शिवसंकल्प अभियानाचे आयोजन शिवप्रेमींनी केले असता आतापर्यंत तालुक्यातील थार , कार्ला , शेरी व तेल्हारा शहरासह तालुक्यामधील तीनशे रक्तदात्यांनी आपले रक्तदान करून या राष्ट्रीय कार्यामध्ये सहभाग घेतला असून २६ जानेवारीला दहिगाव वडगाव बेलखेड गाडेगाव व उकळी बाजार येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तर ४ फेब्रुवारीला वांगरगाव बाबुळगाव तळेगाव पातुर्डा येथे रक्तदान शिबिर होणार तसेच ७ फेब्रुवारीला अडगाव येथे तर १२ फेब्रुवारीला दानापूर भांबेरी रायखेड कोठा व चांगलवाडी येथे रक्ताचा शिबिराचे आयोजन करण्यात आले १९ फेब्रुवारीला तळेगाव बाजार माळेगाव बाजार व पाथर्डी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सदर अभियान हे शिवजयंतीपर्यंत चालू राहणार आहे आज पर्यंत शहरासह तालुक्यामधील तीनशे रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे यामध्ये पती-पत्नी वडील मुलगा एकाच कुटुंबातील दोघे भाऊ अशा प्रकारे अनेक युवक युवती व महिलांनी सुद्धा सहभाग घेऊन रक्तदान केले आहे या रक्तदान शिबिराचे आयोजन शिवप्रेमींनी केले असून या शिव संकल्प अभियाना मध्ये समाजातील प्रत्येक घटक सहभागी होत आहे झाला आहे हे येथे उल्लेखनीय .
Users Today : 12