गीत गायन स्पर्धेत गाडगे महाराज विद्यालय व कमवि अव्वल ,,,

Khozmaster
2 Min Read
मूर्तिजापूर : मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यांतर्गत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने येथील श्री गाडगे महराज विद्यलय व कनिष्ठ महाविद्यालयात घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय गीतगायन स्पर्धेत गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ माहाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला.
          वैयक्तिक व सामुहिक अशा दोन गटात झालेल्या यास्पर्धेत तालुक्यातील शाळा, महाविद्यालये व गायक कलावंत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
           स्पर्धेचे उद्घाटन सकाळी साडेअकरा वाजता शिक्षण विस्तार आधिकारी आन्सार यांच्याषहस्ते झाले. प्राचार्य गजानन बोचरे यांच्या अध्यक्षतेखालील उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रा.अविनाश बेलाडकर, पर्यवेक्षक श्याम कोल्हाळे उपस्थित होते. सुरुवातीला गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रा.सतीश अनासने, विनोद तायडे, किर्तीकुमार जयस्वल यांनी पाहुण्याचे स्वागत केले. परीक्षक मम्हणून म्हणून गजानन इंगळे, निलेश मेहरे, सुनिल ढोकणे यांनी काम पाहिले. अमित वहिले, सुमित वहिले, आदित्य वहिले, अक्षयबुराणे, राहुल नाईक यांनी गायकांना संगित साथ दिली. सूत्रसंचालन  प्रा.वृषाली मुंजेकर यांनी केले. प्राचार्य गजानन बोचरे, शिक्षण विस्तार अधिकारी अन्सार व प्रा.अविनाश बेलाडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मातृभाषेचे महत्व विशद करून मराठी भाषेच्या संवर्धनात विद्यार्थ्यांचा वाटा मोलाचा असल्याचे नमुद केले.
          सामुहिक गटात श्री गाडगे महाराज विद्यलय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या चमूने प्रथम, मालाणी शाळेच्या चमुने दुसरा, तर भारतीय ज्ञानपीठच्या चमुने तिसरा क्रमांक पटकावला. वैयक्तिक गटात मालाणी शाळेच्या प्रथमेश नळकांडे याने प्रथम मानांकन प्राप्त केले. गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची तृप्ती मोरे हिने दुसऱ्या, तर भारतीय ज्ञानपीठची प्रांजली मानकर हिने तिसऱ्या क्रमांकाचे मानांकन प्राप्त केले.
0 9 3 7 7 5
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *