औरंगाबाद प्रतिनिधी ,गोकुळसिंग राजपूत
वैजापूर
या विश्वातील ज्या व्यक्तीवर परमेश्वराची कृपा होते त्या व्यक्तीवर जगाची कृपा होते ,या साठी प्रत्येकाने परमपिता परमेश्वर यांच्यावर शुद्ध मनाने श्रद्धा ठेवावी व स्वतः बरोबर कुटुंब व समाजाचे कल्याण साधावे असे अमृत वचन भागवताचार्या श्री देवकीनंदन ठाकुरजी महाराज यांनी दि.२२/१/२३ रविवार रोजी जीवनगंगा वसाहती जवळील
कथा स्थळी केले, ते पुढे म्हणाले की चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते,आई -वडिलांची मनोभावे सेवा करावी त्यांची हेळसांड करू नये,वृद्धापकाळात त्यांची
सेवा करावी, भागवत कथा श्रवण करून त्यातून
जीवनाला विधायक व रचनात्मक कार्याकडे न्यावे असेही ते पुढे म्हणाले, या समयी सायंकाळच्या आरती समयी आ,प्रा,रमेश पा,बोरनारे,माजी आमदार भाऊसाहेब पा,चिकटगांवकर,नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी,कृष्णा पा,डोनगांवकर,जि, प,च्या माजी अध्यक्ष इंदूमती डोनगावकर, सौ,देवयानी डोनगावकर,मनाजी पा,मिसाळ,पारस घाटे, कार्यक्रम समिती अध्यक्ष राजू राजपूत,भावलाल काका सोमासे,गणेश खैरे सचिव प्रेम राजपूत,सम्राट तांबूस, कैलास पवार,अशोक पवार,सोनू राजपूत, मनोज राजपूत,योगेश राजपूत, किरण राजपूत,प्रमोद राऊत, मनीषा राजपूत, वर्षा राजपूत,शीतल राजपूत, दुर्गा राजपूत,मीना राजपूत, रेणू राजपूत याही सहकार्य करीत आहेत,सूत्र संचलन धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले आभार प्रेम राजपूत यांनी मानले,
Users Today : 12