देव्हारी येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर व स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न

Khozmaster
4 Min Read
  • सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
  • सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जय कालिंका देवी शिक्षण संस्था संचलित कै लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील कला वाणिज्य  व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय सावळदबारा व संत सेवालाल महाराज माध्यमिक विद्यालय देवारी यांच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रीय सेवा योजना शिबिर व उद्घाटन प्रसंगी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद येथील विभाग प्रमुख गटप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील शिबिराचा आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी देवारी येथील सरपंच शामीर तडवी उपसरपंच मीराताई उत्तम चव्हाण व संस्था अध्यक्ष भाऊराव लक्ष्मणराव कोलते व संचालक मंडळ उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रमुख पाहुणे सावळात 12 केंद्रप्रमुख श्रीमती शीलाताई राठोड ह्या होत्या कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करून सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. याप्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक आणि माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी जोरदार केले सर्वांना पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सर्वांचे स्वागत केले याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेचे निवृत्त शिक्षक राजू चव्हाण सर मुख्याध्यापक मदन गायकवाड मोरे सर दीपक चोपडे व इतर तसेच संस्था संचालक मेघराज जाधव मदन ढोकळे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष विठ्ठल चव्हाण गावातील प्रतिष्ठित नागरिक व चेअरमन नरेंद्र ठाकूर देवारी येथील माजी उपसभापती  उत्तम भाऊ चव्हाण रोहिदास भाऊ राठोड संजय भाऊ जाधव रामचंद्र चिमणकर निमिचन जाधव पंडित राठोड व इतर गावातील मान्यवर व पालक वर्ग उपस्थित होते याप्रसंगी पंजाबराव शेळके राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे फळ मिळवायचे असेल तर मेहनत करावीच लागते व त्यासाठी विद्यार्थी दशे पासून सुरुवात करावी करिता विद्यापीठ स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना हा कार्यक्रम राबविला जातो व या माध्यमातून पाणी आडवा पाणी जिरवा मातीचे भूस्खलन रोखणे झाडे लावणे माती बंधारे तयार करणे गावातील स्वच्छता करणे गाजर गवत निर्मूलन करणे यासारखे कार्यक्रम राबविले जातात या कार्यक्रमाचे निमित्त म्हणून यावर्षी शेतात जाण्याचा माती रस्ता तयार करावा व शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा रस्ता तयार करावा असे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून देवारी या गावी करण्याचे ठरवले आहे यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेतील जवळपास 100 च्या वर विद्यार्थी यामध्ये सहभाग घेत असून सर्व कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रमाधिकारी यांनी केलेले आहे असे मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक मध्ये जीवन पाटील सर मुख्याध्यापक  माध्यमिक विद्यालय देव्हारी यांनी शाळेचे होत असलेली प्रगती व शाळेमध्ये मुलींचे वाढते प्रमाण लक्षात घेता बेटी बचाव बेटी पडाव अभियान उत्तमरीत्या आम्ही राबवत आहोत व गुणवंत विद्यार्थी घडवण्याचे कार्य शाळेमध्ये होत आहे असे सांगितले वर्ग आठवी ते दहावीतील अनेक विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनामध्ये विशिष्ट कलागुणांना वाव देण्यासाठी सहभाग नोंदवलेला आहे त्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न केलेले आहे सुदाम जाधव पांडुरंग राठ राठोड तुकाराम राठोड अमोल वानखेडे अंकुश कोलते विकास सुरडकर व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक मनोहर पडवळ प्रदीप पाटील किशोर चोपडे गणेश सत्रे अजय रबडे हिरालाल सोनवणे मोहन बोरे सुनील कुमार चव्हाण रिंकेश रबडे सुनील कुमार पवार सुभाष राठोड गणेश मोहने सतीश गावंडे व इतर शिक्षक उपस्थित होते परिसरातील सर्व पत्रकार बंन्धू  गोकुळसिंग राजपूत , रहीम पठाण, सुनील चव्हाण ,सुनील चोरमले,बाहुदूरसिंग चव्हाण हे पत्रकार बंधू उपस्थित होते अशी माहिती प्रा.जीवन कोलते सामाजिक कार्यकर्ते यांनी बोलताना सांगितले.
0 9 3 7 7 4
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *