पहूरच्या शिक्षकाचा वाघूर नदी संवर्धनासाठी जागर तालुका विज्ञान प्रदर्शनात प्रकल्प

Khozmaster
1 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जामनेर तालुक्यातील  – पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील प्रयोगशील शिक्षक शंकर रंगनाथ भामेरे यांनी ५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ‘होय मी नदी बोलतेय ‘प्रकल्प सादर करून वाघूर नदी संवर्धनाचा जागर केला .
       जामनेर पूरा  येथील ललवाणी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे नुकतेच सुवर्ण महोत्सवी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले .या प्रदर्शनात शंकर भामेरे यांनी पहुर येथील वाघुर नदीचे आत्मवृत्त सादर करून वाघुर नदीची कथा आणि व्यथा व्यक्त केली .
  वाघुर नदीसह सर्वच नद्यांचे आपण संवर्धन करायला हवे असे आवाहन करून वाघुर नदीच्या पात्रातील प्रदूषण आणि कचऱ्याचे ढीग दूर करण्याच्या शिफारशी त्यांनी सुचवल्या .
माध्यमिक शिक्षक गटातून त्यांनी सदर प्रदर्शनात सहभाग नोंदवून त्यांनी पर्यावरण आणि विज्ञान प्रेमींचे लक्ष वेधले.
त्यांच्या प्रकल्पात गटशिक्षणाधिकारी रामकृष्ण लोहार , शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरोदे , शिक्षण विस्तार अधिकारी एन . एफ . चौधरी , शालेय पोषण आहार अधीक्षक विष्णू काळे , प्राचार्य जे . पी . पाटील , पी . टी . पाटील ,  जी . जे . पाटील यांनी भेट देऊन त्यांचे कौतुक केले .
0 9 3 7 7 5
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *