सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील नादांतांडा येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय सोयगाव व आत्मा विभाग सोयगाव अंतर्गत मौजे नादांतांडा येथे हरभरा पिकाची शेतीशाळा तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ व मंडळ अधिकारी, आत्मा पर्यवेक्षक अमोल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. सर्वप्रथम हरभरा पिकाचे निरीक्षण घेऊन पिकावर आढळणाऱ्या किडी यांची ओळख प्रत्यक्ष क्षेत्रावर करण्यात आली. पिकावर येणारी कीड व रोग यावरील उपाययोजना कश्या करण्यात याव्या याबाबत शेतकऱ्यांना मानसिंग भोळे, अर्जुन सुरडकर कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक अतुल पाटील कृषी सहायक यांनी मार्गदर्शन केले. हरभरा पिकाला फुले व घाटे लागण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकाचे एकात्मिक किड नियंत्रण करण्यासाठी एकरी ४-५ कामगंध सापळे लावावे जेणेकरून आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्या नंतर उपाययोजना करता येतील. गरजेनुसार कीटकनाशकांची फवारणी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन कृषी सहायक विजयसिंह राजपूत,विश्र्वजीत तायडे यांनी केले.अमोल महाजन कृषि सहाय्यक यांनी महाडीबीटी अंतर्गत योजनांची सविस्तर माहिती दिली. समूह सहायक चेतन सावंग यांनी पोक्रा योजनेची माहिती दिली. कार्यक्रमाकरिता नादांतांडा येथील माजी सभापती धरमसिंग चव्हाण, मेघराज चव्हाण अशे बहुसंख्य गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशी माहिती सोयगाव कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक हेमंत देशमुख यांनी बोलताना सांगितले.
Users Today : 13