शिवना प्रतिनिधि मुजीब शेख
सिल्लोड तालुक्यातील आढळलेल्या मृतदेह प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळली आहे. मृत तरुणाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पत्नीशी अनैतिक संबंधच्या संशयावरून मित्राचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
किरण नारायण सुरडकर (वय २८ रा. पानवडोद) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर राजू प्रल्हाद लाड ( रा. पानवडोद) असे आरोपीचे नाव आहे किरण सुरडकर पाच दिवसापासून बेपत्ता होता वडील भाऊ यांनी त्याच्या बरेच शोध घेतला मात्र तो सापडला नाही बेपत्ता होऊन पाच-सहा दिवस झाल्याने( दि.२०) शुक्रवारी सकाळी भाऊ दीपक सुरडकर अजिंठा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जात होता. या दरम्यान गोळेगाव- शिवना रस्त्यावरील पानवडोद खुर्द शिवारातील विहिरीमध्ये मृतदेह आढळल्याची माहिती मिळली. घटनास्थळी जाऊन पाहिले असता मृतदेह भावाचाच असल्याचे खात्री पटली . यानंतर मृत्यूच्या भावाने शुक्रवारी रात्री अजिंठा पोलीस ठाण्यात खून झाल्याची तक्रार दाखल केली भाऊ बेपत्ता चाला त्या दिवशी राजू परलाद लाड घरी आला होता .त्यांनी माझा भाऊ व गावातील दोन मित्रांना घरी नेले होते घातपात करण्यासाठी माझ्या भावाला घरी नेले व पत्नीशी अनैतिक संबंधच्या संशयावरून खून केला अशी तक्रार किरणच्या भाऊ दीपक सुरडकर यांनी दिली आहे या प्रकारांनी अजिंठा पोलीस ठाण्यात कोणचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास साहेब पोलीस निरीक्षक अजित विसपुते करीत आहे
Users Today : 13