खूपटा, जळकी बाजार, येथील चोरट्यांना गजाआड

Khozmaster
1 Min Read
मुद्देमाल सह तीन गजाआड अजिंठा पोलिसांची कारवाई
सिल्लोड तालुक्यातील खूपटा जळकी बाजार येथील चोरी प्रकरनी अजिंठा पोलिसांनी तीन चोरट्यांना गजाआड केले असून त्यांच्या ताब्यातून ६ मोबाईल १ ग्रामची सोन्याची बाली व मोटरसायकल असा एकूण ४३ हजारचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तालुक्यातील खोपटा येथे केशव विठ्ठल काळे यांच्या शेतातील घरातून एक मोबाईल, नगद व एक ग्रामची सोन्याची बाली तसेच जळकी बाजार येथील उमेश दांडगे,व  संदीप वरपे यांच्या घरातून मोबाईल अज्ञान चोरट्यांनी लंपास केल्याची घटना एक ऑक्टोंबरच्या रात्री उघडकीस आली होती. याबाबत अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. साहेब पोलीस निरीक्षक अजित विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू  राठोड, बिट जामदार अरुण गाडेकर, विकास चौधरी, दिलीप तडवी, प्रभाकर जाधव ,यांच्या पथकाने कारवाई केली राजेंद्र चांडोळ( रा. जुना जि. बुलढाणा), सोमीनाथ श्रीराम चांडोल (रा. टाकली कदिम ता. गंगापूर) अनिल दुबा माळी (रा. लासुरगाव ता. वैजापूर) असे आरोपींचे  नाव असून या तिघांना गजाआड केले आहे. त्याच्या ताब्यातून १८ हजार रुपये किमतीचे ५ मोबाईल ५ हजार रुपयांचा पार्थ पोलीस ठाण्यातील गुन्हा मधील एक मोबाईल, पाच हजार रुपये किमतीची दोन सोन्याची बाली, व गुन्ह्यात वापरलेली १५ हजाराची एक मोटर सायकल असा एकूण ४३ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केले आहे.
0 9 3 7 7 4
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *