निगंनुर येथील आरोग्य उपकेन्द्राचे बांधकाम थातुरमातूर

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी मैनोदिन सौदागर निगंनुर  : –
         निंगनुर येथील प्राथमिक आरोग्य उपकेन्द्राच्या बांधकामाच्या सुरुवातीलाच थातुर मातुर पद्धतीच्या कामाने प्रारंभ होत असल्याने इमारतीच्या बांधकामाची विल्हेवाट लागणार की काय ? असा संशय येत असल्यामुळे संबंधित ठेकेदाराच्या वर्तनुकीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे .
             निंगनुर येथील जुन्या आरोग्य उपकेन्द्राची इमारत पाडून मुरुमा ऐवजी त्याचा मलबा नवीन इमारतीत भराव टाकला जात आहे . या व्यतिरिक्त इतर बांधकाम साहित्य निकृष्ठ दर्जाचे वापरले जात असल्याचाही आरोप नागरिकांकडून होत आहे . सदर इमारतीचे काम दर्जेदार व्हावे अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे . बांधकाम विभाग व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष पुरवून संबंधित ठेकेदाराच्या मनमानीला आळा घालावा अशी मागणी आहे .
0 9 3 7 7 4
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *