शहीद शिरीषकुमार मंडळातर्फे सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

Khozmaster
1 Min Read
नंदुरबार -: स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त तसेच  हिंदुहृदयसम्राट शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त
शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे प्रतिमापूजनाने अभिवादन करण्यात आले.
शहरातील बालवीर चौकात आयोजित कार्यक्रमास नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस एकलव्य विद्यालयातील एनसीसीचा विद्यार्थी वेदांत भावसार याच्या हस्ते पुष्पार्पण करण्यात आले तर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस सिने अभिनेता व  पत्रकार रणजीतसिंह राजपूत यांनी माल्यार्पण केले.
     याप्रसंगी पत्रकार रणजीत राजपूत यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला.तर  स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याची माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी दिली. एनसीसी चे विद्यार्थी वेदांत भावसार, जयंत मराठे, युग मराठे यांनी सलामी देऊन अभिवादन केले.अभिवादन कार्यक्रमास मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र चौधरी,गवळी समाज संस्थेचे सल्लागार प्रकाश घुगरे,सहकार भारती संस्थेचे सदस्य सुनील साळी,दिलीप कुंभार, अशोक कुंभार, भरत मोरे,प्रफुल्ल राजपूत,प्रिन्स  कुशवाह,मयुर वानखेडे,गोलु मोरे, आदी उपस्थित होते.
   कार्यक्रमाचे संयोजन विशाल हिरणवाळे, धिरेन हिरणवाळे यांनी केले.
0 9 3 7 7 7
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *