प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार :-आमदार कार्यालयात हिंदुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करीत बाळासाहेबांच्या जयघोष केला.
बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे सोमवारी हिंदुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांनी बाळासाहेबांच्या जयघोष करीत घोषणा दिल्या.प्रसंगी माजी नगरसेवक परवेज खान,तालुकाप्रमुख रवींद्र गिरासे,माजी नगरसेवक गजेंद्र शिंपी, ज्येष्ठ कार्यकर्ते ताराचंद माळसे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अंकुश पाटील,पथराईचे सरपंच विलास पाडवी,अजेपुरचे सरपंच संजय चौरे, बापू मराठे,गणेश पाटील आदी उपस्थित होते.
Users Today : 15