कळमनुरी तालुक्यातील दाभडी महालिंगी ग्रामपंचायत कडून शासनाच्या विविध योजनेचा गैरवापर करून निधीचा मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याबाबत आम आदमी पक्षाचे तालुकाप्रमुख मारुती जाधव तसेच गावातील सुज्ञ नागरिक यांनी पाठपुरावा करून संबंधित ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासंदर्भामध्ये वेळोवेळी निवेदन दिले होते परंतु उदासीन जिल्हा परिषद चे मुख्याधिकारी संजय दैने यांच्याकडे सर्व चौकशीचे अहवाल प्राप्त असून ग्रामसेवक तसेच गटविकास अधिकारी तसेच इंजिनियर हे दोषी आढळले असताना सुद्धा संबंधितावर कारवाई करण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे त्यामुळे आज थेट जिल्हाधिकार्यालय गाठून गावातील काही ग्रामपंचायत सदस्य तसेच आम आदमी पक्षाचे तालुका प्रमुख मारुती जाधव यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनास जाग आली आहे जिल्हाधिकारी महोदयांनी तात्काळ कार्यवाही करण्यासंदर्भात संजय दैने यांना आदेश दिले आहेत त्यामुळे या कारवाईकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी बालाजी देशमुख
Users Today : 15