नवनिर्वाचित ग्रामपंचायत कार्यकारिणी सावंगी गवळी “ॲक्शन” मोड मध्ये

Khozmaster
3 Min Read
प्रतिनीधी रवि मगर              नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सावंगी गवळी ची ग्रामपंचायत अविरोध निवडून आलेली आहे. ह्यात सरपंच सौ. सविताताई सुरेश शेजोळ ह्यांची अविरोध निवड झालेली आहे.आज दि २३ जानेवारी रोजी त्यांचे वतीने  ग्रामपंचायत  सावंगी गवळी मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी  ग्रामपंचायत सावंगी गवळी चे नवनिर्वाचित सरपंच , उप सरपंच, व सदस्य उपस्थित होते.
                                      मागील बर्याच दिवसापासून रखडलेली कामे आपण पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करू असे वक्तव्य ह्यावेळेस सरपंचानी केले. शाळा समिती अध्यक्षा सौ.सुजाताताई प्रकाश शेजोळ यांनी शाळेच्या  काही समस्या ग्रामपंचायत मध्ये मांडल्या.व त्यासंदर्भातले अर्ज सादर केलें. तेव्हा सरपंच व त्यांचे सदस्य यांनी शाळेमध्ये भेट दिली. ह्यावेळी मराठी उच्च प्राथमिक शाळा सावंगी गवळी येथील मुख्यध्यापक श्री. सदावर्ते सर आणि श्री दुकानदार सर यांनी सरपंच व उपसरपंच ह्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व मुख्यध्यापक यांनी शाळेचे वीजबिल बर्याच दिवसापासून भरलेले नाही व शाळेच्या एका खोलीमध्ये ग्रामपंचायत ने जिम खाना टाकलेला आहे. ती खोली रिकामी करावी व शाळेतील काही खोल्याचे स्लाब गळतो त्याचेवर लक्ष टाकावे हि विनंती केली. त्यावेळी शाळेतील सर्व प्रकारच्या अडचणी आमच्या अगोदरच लक्ष्यात आलेल्या आहेत,व त्याचेवर योग्य तो निर्णय आम्ही घेणार आहोत. असे प्रतिपादन सरपंच सौ. साविताताई सुरेश शेजोळ यांनी केले. तसेच आपल्या शाळेला आदर्श शाळा बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असेदेखील सांगितले. शाळेचे वीजबिल आम्ही लवकरच भरून देऊ व शाळेची खोली देखील शाळेला रीकामी करून देऊ असे आश्वासन उपसरपंच दीपक पांचाळ व सदस्य रमेश पडघाण यांनी केले. तसेच गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा जो निर्णय आमही घेतलेला आहे. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत असे वक्तव्य केले. शाळेच्या धावत्या भेटीसाठी सरपंच सौ. साविताताई सुरेश शेजोळ, उपसरपंच दीपक पांचाळ, सदस्य सौ. ज्योतीताई गजानन शेजोळ, श्री. रमेश पडघाण , शाळा समिती अध्यक्ष सौ. सुजाताताई प्रकाश शेजोळ ग्रामपंचायत शिपाई श्री. रवींद्र कापसे,केशव शेजोळ श्री. सुरेश शेजोळ, व श्री प्रकाश शेजोळ यांचा समावेश होता.
तेव्हा आता ग्रामपंचायत सावंगी गवळीची नवनिर्वाचित कार्यकारिणी आपली आश्वासने कितीपद पूर्णत्वास नेतात; आणि गावाच्या विकासासाठी घेतलेले निर्णय किती कालावधी मध्ये पूर्ण करतात याच्याकडे सर्व गावकरी मंडळीचे लक्ष लागेलेले आहे.
0 9 3 7 7 7
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *