बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) डॉ.भुषण कुमार उपाध्याय (भा.पो.से.), महासमादेशक होमगार्ड, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिनांक- 23-01-2023 रोजी होमगार्ड जिल्हा – रायगड कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांना श्री. जनार्दन पवार, केंद्र नायक यांचे नेतृत्वाखालील रायगड होमगार्डसच्या वतीने 1 अ 20 चा सन्मानगार्ड मानवंदना देणेत आली. याप्रसंगी मा. पोलीस अधिक्षक, रायगड- श्री. सोमनाथ घार्गे साहेब व मा. जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक, रायगड- श्री अतुल झेंडे साहेब उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यांत आले. तसेच जिल्हा नियोजन समिती यांचे कडुन जिल्हा होमगार्ड कार्यालयास मंजुर झालेल्या कवायत मैदान सपाटीकरण कामाचा शुभारंभ डॉ.भुषण कुमार उपाध्याय (भा.पो.से.), महासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे हस्ते करण्यांत आला. यावेळी प्रशंसनीय कामगिरी बजावलेल्या होमगार्ड जवानांचा प्रशंसापत्र देऊन मा. महासमादेशक यांचे हस्ते सत्कार करण्यांत आला. कार्यक्रमामध्ये जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक रायगड श्री. अतुल झेंडे यांनी मा.महासमादेशक होमगार्ड, महाराष्ट्र राज्य, मुंबई डॉ.भुषण कुमार उपाध्याय यांना मानचिन्ह देवुन त्यांचे स्वागत केले. डॉ. भुषण कुमार उपाध्याय यांनी केलेल्या अथक प्रयत्नातुन होमगार्ड यांना मिळवून दिलेल्या विमा संरक्षण कवच योजने प्रित्यार्थ रायगड जिल्हयातील होमगार्डसच्या वतीने शाल-श्रीफळ देऊन गौरविण्यांत आले.कार्यक्रमात मा. जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक श्री. अतुल झेंडे साहेब यांनी रायगड जिल्हयात होमगार्डस करीत असलेल्या कामगिरीचा आढावा घेऊन मा. महासमादेशक यांनी होमगार्डसना मिळवुन दिलेल्या विमा संरक्षण योजनेमुळे रायगड जिल्हयातील होमगार्ड श्री. लक्ष्मण आखाडे यांना रु. 25 लाख विमा लाभ मिळु शकला याकरीता रायगड जिल्हा होमगार्डचे वतीने आभार व्यक्त केले. यावेळी मा. पोलीस अधिक्षक, रायगड – श्री.सोमनाथ घार्गे यांनी होमगार्ड बजावत असलेल्या कामगिरीचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. भुषण कुमार उपाध्याय (भा.पो.से.),महासमादेशक होमगार्ड, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी होमगार्डसना कशा प्रकारची जीवनशैली आत्मसात करावी, कर्तव्य बजावत असताना माणुसकी जपुन समाजोपयोगी कार्य कसे करावे, आपल्या कर्माने कर्तृत्व सिध्द कसे करावे या बाबत बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच जीवनात योगा, प्राणायाम यांचे महत्व विशद करुन आपली प्रकृती निरोगी ठेवुन दीर्घायुष्य जगण्याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमा मध्ये रायगड जिल्हयातील होमगार्ड पथकांचे समादेशक / प्रभारी अधिकारी तसेच मोठया संख्येने पुरुष व महिला होमगार्ड जवान उपस्थित होते. याप्रसंगी श्री.न.ल.पाटील,कंपनी नायक व श्रीमती प्रेरणा भालेराव, होमगार्ड कर्जत पथक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री गणेश कदम, सामुग्री प्रबंधक सुभेदार, होमगार्ड रायगड यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. सुभाष धापटे, प्रशासिक अधिकारी यांनी केले केले.