नांदुरा प्रतिनिधि (शुभम ढवळे) _छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हिंदु धर्मासाठी झटणारे व मराठी माणसाला ताठ मानेने जगायला शिकवणारे एकमेव थोर व्यक्ती म्हणजेच *हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे..!* आज सोमवार दि.२३/०१/२०२३ म्हणजेच माननिय *बाळासाहेबांची जयंती* होय ; त्यांच्या जयंतीचे निमित्त साधून *बाळासाहेबांची शिवसेना नांदुरा शहर व महिला आघाडी यांच्या वतीने विविध कार्यक्रम* राबविण्यात आले. *वर्ग पहिली ते आठवी* वयोगटातील विद्यार्थ्यांची तीन विभागात वेगवेगळे विषय देऊन *चित्रकला स्पर्धा* घेण्यात आली यामध्ये *प्रथम व द्वितीय* येणाऱ्या विद्यार्थ्याला पारितोषिक देण्यात आले तसेच इतर विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षिसं देण्यात आली. त्यांनतर नांदुरा खुर्द येथील बालवाडी मधील *विद्यार्थ्यांना वही -पेन्सिल, चॉकलेट* देण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेना कार्यालय नांदुरा येथे *बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले तसेच त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांना आदरांजली अर्पित करण्यात आली. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अनमोल विचार नवीन पिढीने आत्मसात करावे असे आवाहन शिवसेना, नांदुरा शहर यांच्या वतीने करण्यात आले._ यावेळी यावेळी संतोषभाऊ डिवरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील भाऊ जुनारे तालुकाप्रमुख
अनिल जांगळे, शिवसेना शहर प्रमुख, संजू मेहसरे, उपशहर प्रमुख महादेव सपकाळ उपशहर प्रमुख, संजू मात्रे तसेच शिवसेना महिला आघाडीच्या सरिताताई बावस्कार महिला आघाडी शहर प्रमुख, प्रज्ञाताई तांदळे महिला आघाडी उपशहर प्रमुख सौ.भावना सोनटक्के -सचिव, विजया गोरे,सहसचिव, सुमनबाई गव्हाळे, जया इंगळे, सौ. रुपाली घोपे सहसचिव, सौ. भाग्यश्री तांदळे, कु.स्वाती पारधी, पल्लवी नावकार, सुनिता इंगळे, दुर्गाबाई वाडेकर, सुनिता हिंगणकर, छाया नारखडे, रेखाताई किनगे, सपना रूम,कांचन बावस्कार,प्रमिला राखोंडे, उषा बावस्कार, यांच्यासह इतर महिला उपस्थित होत्या.
Users Today : 15