खुली जिल्हास्तरीय नक्षञ काव्यमैफलचे आयोजन-

Khozmaster
1 Min Read

कवी हा जगताचा धनी ” नक्षत्रांच देणं काव्यमंच -शाखा धुळे जिल्हा तर्फे भव्य खुली जिल्हास्तरीय नक्षञ काव्यमैफल चे आयोजन करण्यात आले आहे.       यावेळी सर्व उपस्थित कवींना कविता सादर करायला मिळणार आहेत. यामध्ये हिंदी मराठी अहिराणी उर्दू आणि प्रादेशिक भाषेत रचना सादर करणार आहेत. प्रत्येक सहभागींना फोरकलर सन्मानपञ ,गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.धुळे शहरातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजच धुळे जिल्हाअध्यक्ष कविवर्य मुरलीधर पांडे तर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रम दिनांक – ४ फेब्रुवारी २०२३ कार्यक्रम स्थळ – श्री संत रविदास समाज मन्दिर ,डाॅ.आंबेडकर लाॅ काॅलेज शेजारी,देवपूर,धुळे जि.धुळे कार्यक्रम वेळ – शनिवार सकाळी१०.३० वा.कार्यक्रमाचे विशेष प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा. राजेंद्र दशरथ सोनवणे(कवी वादळकार) पुणे (संस्थापक-राष्टीय अध्यक्ष- नक्षत्रांच देणं काव्यमंच)हे उपस्थित राहत आहेत.कार्यक्रम अध्यक्ष प्रा.विजयचंद्र जाधव,कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष उद्योजक राहलशेठ जगताप,कार्यक्रमाचे उदघाटक कवी जगदीश देवपूरकर,कार्यक्रम अतिथी प्रा.डाॅ.क.उ.संघवी,प्रविण अकवारे,विजयकुमार अग्रवाल,प्रा.बी.एन.पाटील,हुसेनगुरुजी,अॅड.एम.एस.पाटील इ.अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे.कार्यक्रमाचे संयोजन कवी मुरलीधर पांडे (धुळे जिल्हाअध्यक्ष-नक्षञाचं देणं काव्यमंच)यांनी केले आहे.सर्वांना नि:शुल्क व मुक्त प्रवेश आहे.कवींना आदर,सन्मान मिळावा,त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणुन महाकवी कालिदास ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापनदिन व नूतन वर्षाच्या स्वागतासाठी “खुले जिल्हास्तरीय नक्षञ काव्यमैफल चे आयोजन करण्यात आले आहे.मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहान रसिकांना संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क-९४२३९७८७४२ साधावा

0 9 3 7 7 7
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *