मेहकर शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी मोठ्या संखेने उपस्थित रहावे- डाॕ.ज्ञानेश्वर टाले मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत पिक विमा कंपनी तसेच शासनाने पिक विमा दिला नसून यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विविध आंदोलने उपोषणे व निवेदन देऊन वारंवार पिक विमा देण्याची मागणी केली त्या अनुषंगाने काही शेतकऱ्यांना अत्यल्प पिक विमा मिळाला मात्र उर्वरित बऱ्याच शेतकऱ्यांना अजून सुद्धा पिक विमा मिळाला नाही याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी बुलढाणा यांची भेट घेऊन तालुका पिक विमा तक्रार निवारण समितीची बैठक घेऊन सदर प्रोसिडिंगचा अहवाल आपल्या मार्फत शासनास सादर करावा व पिक विमा कंपनीस पैसे देण्यासाठी बाध्य करावे व तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करावी अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने प्रशासनाने थातूरमातूर पणे, तालुका पिक विमा तक्रार निवारण समितीची आचारसंहितेमध्ये बैठक घेतली व शेतकरी प्रतिनिधी यांना बैठकिला बोलावले नाही मात्र यामधून सुद्धा सदर कंपनीने अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा केला नाही व तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेले असून प्रशासन ठोस भूमिका घेत नसून कंपनीवर गुन्हे दाखल करावे व सदर कंपनी ला शेतकऱ्यांचा पिक विमा देण्यासाठी शासन स्तरावर अहवाल पाठवून शेतकऱ्यांना पिक विमा जमा करण्यासाठी ठोस पावले उचलावे तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना अत्यंत कमी पिक विमा मिळालेला आहे त्या अत्यल्प पिक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना फरकाची रक्कम तात्काळ अदा करावी ही मागणी देखील उद्या दिनांक होणाऱ्या आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे आणि हा इशारा मा.जिल्हाधिकारी मा.तहसीलदार कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन देण्यात आला होता मात्र तरीसुद्धा पंधरा दिवस उलटून सुद्धा कारवाई न झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वामध्ये उद्या दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे तरी तालुक्यातील संबंध शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांनी केले.