मेहकर मतदारसंघात खरी लढत डॉ. ऋतुजा चव्हाण व आ. डॉ. संजय रायमुलकर यांच्यातच !; हॅटट्रीक गाठण्यासाठी सज्ज आ. रायमुलकरांपुढे डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी निर्माण केले जबरदस्त आव्हान !; शेतकरी नेते रविकांत तुपकरांसह शेतकरी चळवळीच्या पाठिंब्यामुळे ऋतुजा चव्हाणांचे बळ वाढले !

Khozmaster
2 Min Read

मेहकर – शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर व वंचित, उपेक्षित समाजाचा प्रचंड पाठिंबा मिळत असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या मेहकर – लोणार विधानसभा
मतदारसंघातील उमेदवार तथा शेतकरी नेत्या डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी मतदारसंघात विद्यमान आमदार तथा शिंदे गटाचे शिवसेना-महायुतीचे उमेदवार डॉ. संजय
रायमुलकर यांच्यासमोर मोठे जबरदस्त आव्हान निर्माण केले आहे. दोन शिवसेनेच्या टोकाच्या लढतीत डॉ. चव्हाण यांचा विजय निश्चित मानला जात आहे. ठाकरे गटातील
अंतर्गत गटबाजीदेखील ऋतुजा चव्हाण यांच्याच पथ्यावर पडणार आहे. या मतदारसंघात पहिल्यांदाच ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होत असून, मतदारसंघाच्या
विकासाचा रोडमॅप ऋतुजा चव्हाण यांनी मतदारांसमोर मांडलेला आहे.
लोकसभा निवडणुकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना या मतदारसंघातून जोरदार लीड मिळाला होता. हा मतदारसंघात शेतकरी, कष्टकरी, दलित व बहुजन समाजाची
मते ही प्रबळ असून, मराठा व ओबीसी समाजाचा ज्यांना कौल मिळतो, तो या मतदारसंघातून आमदार होत असतो. यावेळेस पहिल्यांदाच या मतदारसंघात परिवर्तानाची
लाट निर्माण झालेली आहे. शेतकरी चळवळ व शेतकरी नेते रविकांत तुपकर, डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या पाठिंब्यामुळे डॉ. ऋतुजा चव्हाण यांचे पारडे जड झाले असून, त्यांचे
पदाधिकारी व कार्यकर्ते हे मैदानात उतरले आहेत. गावोगावी जाऊन शेतकरी चळवळीतील नेते व कार्यकर्ते हे डॉ. चव्हाण यांच्यासाठी शेतकरी, कष्टकरीवर्गाच्या भेटीगाठी
घेऊन त्यांना शेतकरीहितासाठी ऋतुजाताईंना निवडून देण्यासाठी साकडे घालत आहेत. दुसरीकडे, या मतदारसंघात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू बाळासाहेब
आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. हा दलित, ओबीसी वर्गदेखील डॉ. ऋतुजाताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. किमान लाखाच्या फरकाने ताईंना
विधानसभेत पाठविण्याचा निर्धार महिला, तरूणवर्गाने केलेला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *