मेहकर कमि पिक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना तफावत मेहकर तालुकासाठी साडे चार कोटी रक्कम मिळणार अखेर ३ कोटी ४६ लाख ५३२९ शेतकऱ्यांना १५ दिवसांत मिळणारआज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष डाॕ. ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वामध्ये जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक ३० डिसेंबर २०२२ मा. जिल्हाधिकारी तहसीलदार तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२२-२३ मधिल तूटपुंजी पिक विमा रक्कम मिळालेल्या शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम मिळावी यासाठी मंडळ निहाय शेतकरी निहाय तफावतीची रक्कम अदा करण्यासाठी तफावत अहवाल तयार करून शासनास सादर करावा व ती रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याची कारवाई शासन स्तरावर करावी तसेच तालुक्यातील पीक विमा तक्रारीचा निपटारा करण्यासाठी पिक विमा तक्रार निवारण समितीच्या बैठकीचे आयोजन करून ठोस निर्णय (ठराव)घ्यावे व प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी व शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम मिळालेले या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून दोषीवर कारवाई करणे बाबत मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने अद्याप पर्यंत कुठलीही उचित कारवाई संबंधित प्रशासनाने करून कळविले नसल्यामुळे आज २५ जानेवारी २०२३ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यासह पदाधिकारी व सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन जन आक्रोश मोर्चा तालुका कृषी अधिकारी मेहकर यांच्या कार्यालयावर काढण्यात आला यावेळी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले की जोपर्यंत शेतकऱ्याचा पिक विमा जमा करणार नाही तोपर्यंत कार्यालयातून उठणार नाही असा पवित्रा घेताच संबंधित कृषी विभागाचे प्रशासन व पोलीस प्रशासन हादरून गेले व शेतकरी यांच्या जन आक्रोश मोर्चामुळे संबंधित प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली व अखेर संबंधित प्रशासनाने काय कारवाई मागील निवेदनावर केली त्यांची संपूर्ण माहिती तालुका कृषी अधिकारी यांनी जनआक्रोश मोर्चातील आंदोलनकर्त्यांसोबत सकारात्मक चर्चा केली अखेर सदर प्रशासनाने पिक विमा प्रतिनिधी व वरिष्ठांशी चर्चा करून आंदोलन कर्त्यांना शांत करत निवेदनाच्या अनुषंगाने सगळ्या मागण्या मान्य करण्यात येत आहेत व पैसै घेणाऱ्या सर्वेअर होणार गुन्हे दाखल.तरी त्याबाबत आम्ही लेखी देऊन विनंती करतो की जन आक्रोश आंदोलन स्थगित करावे व लवकरच शेतकऱ्यांना त्यांची फरकाची रक्कम अदा करण्यात येईल मेहकर तालुक्यातील १७५ शेतकऱ्यांचे खाते क्रमांक आय.एफ.सी. कोड शेतकऱ्यांनी पोर्टलवर चुकीचे भरल्यामुळे मंजूर रक्कम परत गेली होती. सदरची यादी कृषि सहाय्यक यांना देण्यात आली होती त्या अन्वये संबंधित शेतकऱ्याचे पासबुक, आधार कार्ड, विमा पावती झेरॉक्स २७/०१/२०२३ पर्यंत विमा प्रतिनिधीकडे जमा करून घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. पंधरा दिवसामध्ये सदर शेतकऱ्याची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा जमा करण्यात येईल असे पीक विमा कंपनीने दिनांक २३/०१/२०२३ पर्यंत १७५ पैकी ५४ शेतकऱ्यांचे कागदपत्र जमा झालेले आहेत असे कळवले आहे.व पिक विमा कंपनीचे कार्यालय बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना तक्रारीसाठी अडचणी निर्माण होत होत्या त्यासाठी पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी दिनांक २३/१२/२०२२ पासून तालुका कृषी अधिकारी कार्यालयात बसून शेतकऱ्यांच्या तक्रारी स्वीकारत आहेत असे सुद्धा तालुका कृषी अधिकारी काळे यांनी लेखी दिले शेतकऱ्यांना कमी जास्त रक्कम मिळालेल्या शेतकऱ्यांचा तफावत अहवाल तयार करून कंपनीने १३९४० शेतकऱ्यांच्या खात्यावर रु. १०६७७३१४९/- जमा केले आहेत.त्यामध्ये तफावत प्रमाणे कंपनीने १३९४० शेतकऱ्यांचा खात्यावर रुपये १५१२४७३५७/- रक्कम जमा करणे आवश्यक आहे.त्याप्रमाणे रुपये ४४४७४२०८/-एवढ्या रुपयांची तफावत असल्याचे निष्पन्न झाले याबाबत सदर जन आक्रोश आंदोलनाचा परीणाम व अभ्यास पुर्ण निवेदन व मागण्या मुळे अखेर आता कमि रक्कम मिळालेल्या शेतकऱ्यांना उरलेली फरक रक्कम मिळणारच व ज्या शेतकऱ्यांचा पिक विमाच जमा झाला नाही त्यांचाही पिक विमा लवकरच दोन आठवढ्यात जमा होणार असल्याचे प्रशासनाने वरीष्ठाशी व कंपनीच्या प्रतिनिधीशी चर्चा करुन सांगितले. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाचे हत्यार उपसणार व येणाऱ्या काळातील आंदोलन अत्यंत तीव्रतेने करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांनी सांगितले.या मोर्चाच्या दरम्यान तगडा पोलीस फौजफाटा लावलेला होता.कंपनीचे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितेश वाघ तालुका कृषी अधिकारी किशोर काळे,कृषि अधिकारी पडोळकर तालुका प्रतिनिधी अंकुश जोगंदड मंडळ कृषि गाडेकर कृषि पर्यवेक्षक खंडारे, बोर्ड, कंकाळ.स्वाभिमानीचे सहदेव लाड,अनिल बोरकर,प्रफुल देशमुख,अमोल धोटे,देवेंन्द्र आखाडे,अशफाक शहा,गणेश गारोळे,ज्ञानेश्वर देवकर,अमोल वाघमारे,जुबेर खान,राजु पळसकर,कैलास उतपुरे, गोपाल सुरडकर,शिवाजी डव्हळे,डाॕ.चंद्रकांत नागरीक, सलिम शहा,सद्दाम शहा,नंदुभाऊ जाधव,सुरेश केनेकर,प्रविण उतपुरे,विनोद फुरंगे,उद्धव दळवी,भागवत असाबे,भुषण मोरे,विठ्ठल शिंणगारे,डिंगाबंर सरकटे,श्रीकांत बोरे,शंकर टाले,संजय टाले,जावेद खाॕ,मनिषा वाघमारे,गणेश धाबे,
Users Today : 39