रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी स्थानिक सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ७४ वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक दादासाहेब भोपळे होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.प्रमोद भोपळे, कोषाध्यक्ष पुखराज राठी, कार्यवाह श्यामशील भोपळे,संचालिका अन्नपूर्णाबाई बंड, साधनाताई भोपळे, संचालक शिवशंकर मार्के, विरेंद्र भोपळे,प्रकाश खोब्रागडे,अनिरुद्ध भोपळे,स्नेहल भोपळे,पोलीस पाटील प्रकाश गावंडे,चंद्रप्रकाश भोपळे,सेवा सहकारी सोसायटीचे उपसभापती जयवंत अस्वार,सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रमोद जानोतकर, राजेंद्र तायडे, देवीदास देशमुख, प्राचार्या रजनीताई वालोकार,गावातील प्रतिष्ठित व दानशूर फारूकअली मिरसाहेब, पुरुषोत्तम गावंडे,सुभाष भगत, रवींद्र भड, राधेश्याम राठी,डॉ.प्रशांत इंगळे,सत्यदेव तायडे,दिनकर राऊत,मोईजोद्दीन जमादार,गणेश राठोड,चंद्रभूषण इंगळे,गोविंद मोगरे,केशव कोरडे,रामेश्वर गुप्ता,गजानन ताळे,गणेश पाटील,अनिल पोके आदींची प्रमुख उपस्थिती होती. या दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या मार्गदर्शिका तथा सामाजिक कार्यकर्त्या स्व.कमलिनीताई सहदेवराव भोपळे यांच्या स्मृती पुरस्कार योजनेअंतर्गत गावातील प्रतिष्ठीत व दानशूर व्यक्तीच्या सहयोगातून शाळेतील गुणवंत व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिस व प्रमाणपत्राचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच याप्रसंगी नितीन निमकर्डे यांच्या मार्गदर्शनात पथक संचलन व विविध क्रीडा कवायतीचे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले.यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतात भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचे कौतुक केले. या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी यश साध्य केले तर विविध स्तरावर त्यांचा गौरव होत असल्याने त्यांनी यश मिळविण्यासाठी प्रामाणिक व कठोर परिश्रम करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे संचलन निखील भड व मयूर लहाने तर आभारप्रदर्शन गणेश खानझोडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक ,शिक्षिका व कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.
Users Today : 18