प्रतिनिधी/मूर्तिजापूर
उमा बॅरेज प्रकल्प व शेतकऱ्यांना विमा कंपनी कडून नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी मूर्तिजापूर येथील राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक सचिव रवी राठी यांनी माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांची मुंबई येथे जाऊन भेट घेऊन चर्चा करण्यात आली.महामंडळ अंतर्गत उमा बॅरेज मध्यम प्रकल्प मुर्तीजापुर या प्रकल्पास मा. जयंत पाटील हे जलसंपदा मंत्री असताना या प्रकल्पास मंजुरी प्रदान करण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव हा प्रकल्प रखडलेला आहे.सदर प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची व बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळेल त्याकरिता हा प्रकल्प सगळ्यांसाठीच फायद्याचा आहे.त्याकरिता आपण याकडे लक्ष द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली.तसेच पीक विमा कंपनी कडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व पीक विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.अतिवृष्टीमुळे सोयाबीन,कपाशी,तुर,मूंग,उडीद आदी पिकांचे नुकसान झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे ऑनलाइन व ऑफलाइन वैयक्तिक तक्रारी ७२ तासाच्या आत नियमाला अनुसरून विमा कंपनीकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु विमा कंपनीने मोजक्याच तक्रारीचे पंचनामे केले आहेत व उर्वरित शेतकऱ्यांचे पंचनामे केली सुद्धा नाही.यावेळी निजामभाई इंजिनिअर,डॉ.गणेश महल्ले,गणेश ताथोंड आदींची उपस्थिती होती.
Users Today : 18