वैजापूर येथे राजमाता जिजाऊ जयंती निमित्त व्याख्यान

Khozmaster
1 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता,२७ येथे नव्यानेच स्थापन झालेल्या जिजाऊ,सावित्री, रमाई प्रतिष्ठान च्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त शनिवार(ता,२८)रोजी सायंकाळी ठीक ४ – ००  वाजता ,पंचायत समिती सभागृह वैजापूर  येथे जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक(ग्रामीण) सुनीलजी लांजेवार यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे, शहर व तालुक्यातील बंधू -भगिनी, तरुण पिढी ,शालेय व महाविद्यालयिन विद्यार्थी, यांनी या व्याख्याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठान च्या वतीने शुक्रवार रोजी ,झालेल्या
बैठकीत पदाधिकारी यांनी केले,आजच्या युवा वर्गाला, तसेच शालेय व महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांना थोर महापुरुष,समाजसुधारक, राष्ट्रभक्त यांच्या कार्य कर्तृत्व
 व त्यांनी केलेल्या विपरीत परिस्थितील कार्याची माहिती व्हावी व वैचारिक ,सामाजिक,राष्ट्रीय जागृती निर्माण होऊन भविष्यात सक्षम,सुदृढ ,निकोप ,निरोगी,  पिढी साकारावी या साठी प्रतिष्ठान च्या वतीने महापुरुष  जयंती निमित्त व्याख्यान कार्यक्रम नियमित घेणार असल्याचे प्रतिष्ठान बैठकीत सर्वानुमते
ठरले,
0 9 3 7 8 0
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *