सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदासाठी 8 फेब्रुवारी रोजी मुलाखती

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -: नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालय ठिकाणी आणि तालुकास्तरावरील असलेल्या न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात सरकार पक्षातर्फे केसेस चालविण्याकरिता मानधन तत्वावर विशेष सहायक सरकारी अभियोक्ता यांची नामिका (पॅनल) तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते.
त्यानुसार 32 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. मुलाखतीस पात्र  उमेदवारांची 8 फेब्रुवारी, 2023 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी नंदुरबार तथा अध्यक्षा, विशेष सहायक सरकारी अभियोक्ता निवड समिती, नंदुरबार यांच्या दालनात मुलाखत घेण्यात येणार आहे.  संबंधित उमेदवारांनी मुलाखतीस वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.
0 9 3 7 8 0
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *