चिखली: कोणतेही काम असू द्या त्या कामाचे व वेळेचे नियोजन, नियोजन आणि कामाच्या टाईम टेबल नुसार काम करणे ही त्या कामाची योग्य पध्दत आहे. कोणत्याही कामासाठी जेव्हढे कठोर परिश्रम, मेहनत घ्याल तितके यश उत्तूंग असते आणि जो कष्ट घेईल तो यशस्वी होईल . परंतु त्यासाठी सुद्धा मेहनत आणि कष्टाला सातत्याची जोड असल्याशिवाय चांगले यश मिळत नाही .ज्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला सातत्याची जोड आहे त्याला उत्तुंग यशापासून कोणीही रोखू शकत नसल्याचे प्रतिपादन आ सौ श्वेता ताई महाले यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रम झाल्यावर एक्झाम वॉरियर चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करताना केले.
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम सर्व शाळांमधून राबविण्यात आला. चिखली विधान सभा मतदार संघातील प्रत्येक शाळेत सुद्धा हा कार्यक्रम राबविण्यात आला. आदर्श विद्यालय येथे आयोजित या कार्यक्रमात आ सौ श्वेता ताई महाले पाटील स्वतः सहभागी झाल्या होत्या. यावेळी एक्झाम वॉरियर चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना सर्वोत्कृष्ट चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमातील एक भाग म्हणून चिखली विधानसभा मतदारसंघात दि २१/१/२०२३ रोजी एक्झाम वॉरियर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मतदार संघातील २४ शाळांनी सहभाग घेऊन जवळपास सहा हजार आठशे विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धेत आपल्या कलेचे प्रदर्शन केले होते. त्यातील प्रत्येक शाळेतून सर्वोत्कृष्ट तीन चित्रांना अनुक्रमे 3100, 2100 व 1100 रुपयांचे बक्षीस देण्यात आले. सोबत प्रत्येक सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींना सहभाग प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले.
आठवड्यातून डिजिटल उपवास ठेवण्याचे मोदींच्या सल्ल्याचे अनुकरण करा

आठवड्यातून डिजिटल उपवास ठेवण्याचे मोदींच्या सल्ल्याचे अनुकरण कराआदर्श विद्यालयात ‘परीक्षा पे चर्चा’चे थेट प्रक्षेपण*
पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शनआजची पिढी डिजिटल गुलाम झालेली आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल इंटरनेट कम्प्युटर या माध्यमातून आपण एकमेकांशी जोडलेले जरी असलो तरी मनाने आणि शरीराने एकमेकांपासून खूप दूर जात आहोत डिजिटल गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी किमान एक दिवसाचा डिजिटल फास्ट म्हणजेच डिजिटल उपवास करण्याचा मुलाचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमात दिला असल्याने त्यांनी दिलेल्या सल्ल्याने प्रत्येकाने अनुकरण करण्याचा प्रयत्न करावा असे सुद्धा आवाहन आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी यावेळी केले.

भारताची भावी पिढी आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम व्हावी म्हणून मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आज ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून देशभरातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांशी मनमोकळा संवाद साधला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था चिखली येथील आदर्श विद्यालयात करून विद्यार्थ्यांसह आ सौ श्वेता ताई महाले पाटील आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
देशाच्या विविध गावांमधून विद्यार्थ्यांनी मा. पंतप्रधानांना प्रश्न विचारले आणि मा. मोदीजींनीही तितक्याच उत्साहात रोजच्या जगण्यातील सोपी उदाहरणे देऊन संकल्पना स्पष्ट केल्या. हार्ड वर्क करावे की स्मार्ट वर्क करावे? या प्रश्नाला उत्तर देताना “स्मार्ट पद्धतीने हार्ड वर्क करावे” असे उत्तर त्यांनी दिले. तसेच काॅपी करणारा विद्यार्थी एखाद्या परीक्षेत गुण मिळवेलही पण आयुष्याच्या परीक्षेत तो मागे पडेल. त्यामुळे यशाला शाॅर्टकट शोधू नका, असाही सल्ला मा. मोदीजींनी दिला. वेळेचे व्यवस्थापन कसे करावे, आपल्यावरील टीकेला कसे तोंड द्यावे, चांगले गुण मिळावे म्हणून कुटुंबातील दबाव कसा हाताळावा यावर अतिशय सखोल मार्गदर्शन मा. पंतप्रधानांनी या वेळी केले. हे मार्गदर्शन केवळ विद्यार्थ्यांनीच नाही तर ज्याला आयुष्यात यश मिळवायचे आहे त्या प्रत्येक व्यक्तीने पुन्हा पुन्हा ऐकावे असे आहे.
Users Today : 18