अकोला जिल्हातील तेल्हारा तालुक्यात दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी होणा-या अमरावती विभाग पदविधर मतदार संघ अमरावती करिता एकुण 3 मतदान केंद्र स्थापित करण्यात आलेले आहे.

Khozmaster
2 Min Read

रितेश कुमार टीलावत तेल्हारा न्युज अकोला जिल्हातील तेल्हारा तालुक्यात दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी होणा-या अमरावती विभाग पदविधर मतदार संघ अमरावती करिता एकुण 3 मतदान केंद्र स्थापित करण्यात आलेले आहे.मतदान केंद्र क्रमांक 131 ठिकाणतहसिल कार्यालय, तेल्हारा या ठिकाणी तेल्हारा शहरातील पदविधर मतदार मतदान करणार आहे. सदर मतदान केंद्राला एकुण 1286 मतदारांची जोडणी करण्यात आली आहे.मतदान केंद्र क्रमांक १३२ ठिकाण सेठ बंसीधर विदयालय, तेल्हाराया ठिकाणी तेल्हारा शहर व ग्रामीण भाग गाडेगाव, थार, घोडेगाव., वरुड बु., राणेगाव, जस्तगाव, पाथर्डी, भोकर, अकोलाराव, सिरसोली, कालेगाव, बेलखेडे, कोठा, रायखेडे, शेरी बु., माळेगाव बाजार, चांगलवाडी, वाडी आदमपुर , जाफ्रापुर, इसापुर, बाजारी बाजार, पिवंदळ बु., वांगरगाव, तळेगाव पातुर्डा, तळेगाव डवला, वरुड वडनेर, बाभुळगाव, खापरखेडी, टाकेबेरी, अटकळी, दापुरा, निंबोळी बु., नेर, पिवंदळ खु., उमरी, आसुड बु., दहिगाव, वडगाव रोठे, खेळदेशपांडे, उबारखेडे, खाकटा, खेळसटवाजी, खेळकृष्णाजी, व इतर मतदान करणार आहे. सदर मतदान केंद्राला 1279 एका उमेदवाराची जोडणी करण्यात आली आहे.मतदान केंद्र क्रमांक- 133 ठिकाण जि.प. म. गांधी कनिष्ठ महाविदयालय, हिवरखेडया ठिकाणी तेल्हारा ग्रामीण भाग हिवरखेड, गोर्धा, हिंगणी बु., हिंगणी खुर्द, तळेगाव बु., तळेगाव खुर्द, मालठाण बु., दानापुर, वारखेड, कार्ला बु. , पिंपरखेड, वारी भैरवगड, सौंदळा, झरीबाजार, खंडाळा, बोरव्हा, भिली, धोंडा आखर, चितलवाडी, अडगांव बु., शिवाजी नगर, व इतर गावातील मतदार मतदान करणार आहे. सदर मतदान केंद्राला एकुण 1119 मतदारांची जोडणी करण्यात आली आहे.मी, डॉ. संतोष येवलीकर, तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी तेल्हारा या व्दारे तेल्हारा तालुकयातील पदविधर मतदारांना आवाहन करतो किंवा दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी होणार मतदानाला सकाळी 8.00 ते 4.00 वाजे पर्यंत मतदान प्रक्रिया चालु राहणार आहे. त्यानुसार पदविधर मतदारांनी वेळेच्या आत जोडणी करण्यात आलेल्या मतदान केंद्रावर मतदान करण्यात यावे.तसेच अमरावती पदविधर मतदार संघाच्या मतदार यादीत मध्ये आपले नाव व बुथ क्रमांक शोधण्यासाठी मा. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाने तयार केलेल्या https://ceoelection.maharashtra.gov.in/gtsearch / या लिंकवर क्लिक करुन आपले नाव, आडनाव व जिल्हयाचे नाव नाव यासह सर्च केल्यास आपले नाव ज्या मतदान केंद्रास जोडले आहे त्या मतदान केंद्राचे नाव व मतदान केंद्र क्रमांक आपणास दिसणार आहे.

0 9 4 7 0 4
Users Today : 54
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *