रितेश कुमार टीलावत
तेल्हारा प्रतिनिधी
हिवरखेड येथील अग्रगण्य नामांकित शाळांपैकी एक शाळा असलेल्या सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम फक्त मनोरंजनासाठी नव्हता तर आत्मरंजनासाठी आयोजीत करण्यात आलेलl होतl. हिवरखेड शहरांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यती अशा कार्यक्रमाचे आयोजन सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड तर्फे करण्यात आलेल होत. त्या कार्यक्रमाचे उद्घाटक हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री विजय चव्हाण होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मॉर्निंग स्टार मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटी व सेंट पॉल अकॅडमी हिवरखेडचे संस्थापक अध्यक्ष आणि हिवरखेड च्या भूमीचे सुपुत्र प्रा श्री नवनीत लखोटीया होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हिवरखेडच्या जिल्हा परिषद सदस्य सुलभाताई दुतोडे ,पंचायत समिती सदस्य गोकुळाताई भोपळे व हिवरखेडच्या सरपंच वैशालीताई वानखडे, तसेच संस्थेचे सचिव प्रमोद चांडक , संस्थेचे उपाध्यक्ष लूणकरण डागा , शारदा लखोटिया, रेखा चांडक , दिपम लखोटीया, विजय बिहाडे आणि केंद्रप्रमुख मनीष गिरे सर तसेच पालक प्रतिनिधी विजय हागे, अनिल खिरोडकlर, राकेश गुप्ता, प्रीती तिडके, विजया कतोरे, प्रीती चांडक मॅडम उपस्थित होते होते. संस्कृती,अध्यात्म आणि मनोरंजन यांचे एकत्रिकरण म्हणजे धनक
कार्यक्रमाची ही संकल्पना संस्थेचे सदस्य दिपम लखोटिया सर यांच्या विचारातून समोर आली. या कार्यक्रमांमध्ये जवळपास 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी यांच्या मार्गदर्शनामध्ये शाळेतील सर्व सर्व शिक्षकांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केला. विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती तर व्हावीच त्या व्यतिरिक्त त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, साहस, विज्ञान निष्ठा या सर्व गोष्टींची रुजवणूक करण्यासाठी तसेच विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून विद्यार्थ्याच्या मनात आपल्या सभ्यतेबद्दल सन्मान असावा या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेल होते. नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर असे नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमासाठी अत्यंत उत्कृष्ट अशी व्यवस्था करण्यात आलेली होती साऊंड सर्विस सुद्धा अत्यंत उच्च दर्जाची उपलब्ध करून देण्यात आलेली होती यामुळे कार्यक्रमाला अजूनच रंगत प्राप्त झाली.
Users Today : 54