गजानन माळकर
तालुका प्रतिनिधी मंठा,
मंठा दि. 8. केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ जल से सुरक्षा ‘ या कार्यक्रमांतर्गत पंचायत समिती मंठा येथे दि 8.2.22 रोजी फील्ड टेस्ट कीट द्वारे पाणी नमुने तपासणी बाबत आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांचेसाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.फील्ड टेस्ट कीट च्या सहाय्याने पिण्याच्या पाण्याची अनुजैवीक व रासायनिक तपासणी बाबत उपस्थीत कर्मचारी यांना आरोग्य विस्तार अधिकारी हरिभाऊ ताठे व पाणी गुणवत्ता सल्लागार श्रीकांत चित्राल यानी सविस्तर मार्गदर्शन केले.या वेळी संजय डोंगर दिवे ,श्री वाघमारे, सुरंगे यांचे सह,तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचारी व आशा सेविका उपस्थीत होते.तालुका स्तरावरील प्रशिक्षणानंतर आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांचेकडुन प्रत्येक गावातील पाच महिलांना पाणी तपासणी चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
पिण्याच्या पाण्याची तपासणी साठी पुर्वी पाणी नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेला पाठवावे लागत असत,त्यानंतर शासनाकडुन उपविभागीय प्रयोगशाळे च्या ठिकाणी पाणी तपासणी ची सोय करण्यात आली व आता फील्ड टेस्ट कीट च्या सहाय्याने गाव पातळीवरदेखील पिण्याच्या पाण्याची जैविक व रासायनीक तपासणी करता येणार आहे.या तपासणीचे निष्कर्ष त्वरीत कळत असल्यामुळे तपासणी मध्ये दुषीत आढळून आलेल्या स्त्रोतांच्या ठिकाणी ग्रामपंचायत मार्फत तात्काळ उपाययोजना करणे शक्य होणारआहे.त्या साठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर पेय्यजल तपासणी साठी फील्ड टेस्ट कीट उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती विस्तार अधिकारी हरिभाऊ ताठे यानी दिली.
Users Today : 15