मुर्तीजापुर प्रतिनिधी:
मुर्तीजापुर तालुक्यात बोकाळलेल्या अवैध दारू विक्रेत्यांवर ग्रामीण पोलिसांची कारवाईचा सपाटा सुरु झाल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम गोरखेडी येथे अवैध दारू विक्रेत्यावर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई अंतर्गत आरोपी लक्ष्मण देवसिंग चव्हाण वय 52 घरातून दारू विक्री करीत असताना,पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. ही घटना 6 फेब्रुवारी रोजी 6:00 वाजताच्या दरम्यान घडली.
सदर घटना अशी की,ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन थाटे व पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर रडके राजुरा घाटे बीट परिसरात प्रोव्हिशन व जुगार रेड करणे कामी पेट्रोलिंग करीत असताना, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार ग्राम गोरखेडी येथील लक्ष्मण चव्हाण हा त्याच्या राहत्या घरात अवैधरित्या विनापरवाना देशी दारू बाळगून त्याची विक्री करीत आहे.या खात्रीलायक बातमीवरून ग्रामीण पोलिसांनी दोन पंचासह त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता, एका थैलीमध्ये 21 नग देशी दारूचे 90 एम एल चे कॉर्टर किंमत अंदाजे 735 रुपये देशी दारूचा साठा मिळून आला. सदरचा देशी दारूचा साठा जप्त करून आरोपीविरुद्ध कलम 65 ई महाराष्ट्र अधिनियम प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली.अधिक तपास ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन थाटे व पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर रडके करीत आहे.
Users Today : 49