मुर्तिजापूर प्रतिनिधी:
ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम जीतापुर नाकट येथे घरातून अवैधरित्या दारू बाळगणे व विक्रेत्याला ग्रामीण पोलिसांनी 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:30 वाजताच्या दरम्यान ताब्यात घेवून गुन्हा नोंद करून मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली.
ग्रामीण पोलिसांनी आज रोजी दिलेल्या माहितीनुसार पीएसआय रंजीत खेडकर,सह पोलीस कॉन्स्टेबल संय्याम लाखपुरी बीट यांना जीतापूर नाकट फाट्यावर खात्रीलायक गुप्त बातमी मिळाली की, परिसरात शिवाजी लिपान मारवाड वय 57 रा.जीतापूर नाकट हा घरात विनापरवाना देशी दारू बाळगतो व विक्री करीत असतो.या खात्रीलायक बातमीनुसार दोन पंचासह त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता, त्याच्या घरात एका थैलीमध्ये 12 नग देशी दारूचे सीलबंद कॉर्टर अंदाजे किंमत 720 रुपये मुद्देमाल मिळून आल्याने त्याला परवाना विचारला असता, नसल्याचे सांगितले. यावरून पंचासमंक्ष माल जप्त करून आरोपीविरुद्ध कलम 65 ई महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रंजीत खेडकर,पोलीस कॉन्स्टेबल संय्याम करीत आहे.
Users Today : 47